Қуръони Карим маъноларининг таржимаси - Маратийча таржима - Муҳаммад Шафий Ансорий

external-link copy
112 : 6

وَكَذٰلِكَ جَعَلْنَا لِكُلِّ نَبِیٍّ عَدُوًّا شَیٰطِیْنَ الْاِنْسِ وَالْجِنِّ یُوْحِیْ بَعْضُهُمْ اِلٰی بَعْضٍ زُخْرُفَ الْقَوْلِ غُرُوْرًا ؕ— وَلَوْ شَآءَ رَبُّكَ مَا فَعَلُوْهُ فَذَرْهُمْ وَمَا یَفْتَرُوْنَ ۟

११२. आणि अशा प्रकारे प्रत्येक पैगंबराकरिता जिन्नांच्या आणि मानवांच्या सैतानांना शत्रू बनविले१ जे आपसात भुरळ पडण्याकरिता मनमोहक गोष्टी मनात आणतात आणि जर तुमच्या पालनकर्त्याने इच्छिले असते तर त्यांनी असे केले नसते. तेव्हा तुम्ही त्यांना व त्यांच्या कारस्थानाला सोडा. info

(१) ही तीच गोष्ट होय जी अनेकरित्या पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना धीर-सांत्वना देण्यासाठी सांगितली गेली की तुमच्यापूर्वी जेवढे पैगंबर आलेत त्यांनाही खोटे ठरविले गेले, सजा-यातना दिल्या गेल्या. तात्पर्य, ज्याप्रकारे त्यांनी धीर-संयम व हिंमत राखली त्याच प्रकारे तुम्हीही या सत्याच्या शत्रूंपुढे धीर, संयम आणि दृढता दाखवा. यावरून हे कळाले की सैतानाचे अनुयायी मनवांखेरीज जिन्नांमध्येही आहेत, आणि हे ते होते जे दोन्ही गटांचे शत्रु, विद्रोही, अत्याचारी आणि दुराचारी गर्विष्ठ आहेत.

التفاسير: