Қуръони Карим маъноларининг таржимаси - Маратийча таржима - Муҳаммад Шафий Ансорий

Бет рақами:close

external-link copy
152 : 6

وَلَا تَقْرَبُوْا مَالَ الْیَتِیْمِ اِلَّا بِالَّتِیْ هِیَ اَحْسَنُ حَتّٰی یَبْلُغَ اَشُدَّهٗ ۚ— وَاَوْفُوا الْكَیْلَ وَالْمِیْزَانَ بِالْقِسْطِ ۚ— لَا نُكَلِّفُ نَفْسًا اِلَّا وُسْعَهَا ۚ— وَاِذَا قُلْتُمْ فَاعْدِلُوْا وَلَوْ كَانَ ذَا قُرْبٰی ۚ— وَبِعَهْدِ اللّٰهِ اَوْفُوْا ؕ— ذٰلِكُمْ وَصّٰىكُمْ بِهٖ لَعَلَّكُمْ تَذَكَّرُوْنَ ۟ۙ

१५२. आणि अनाथाच्या संपत्तीच्या जवळही जाऊ नका, तथापि खूप चांगल्या पद्धतीने, येथेपर्यंत की ते तारुण्यावस्थेस पोहोचावेत, आणि न्यायासह माप-तोल पूर्ण करा. आम्ही कोणावर त्याच्या कुवतीपेक्षा जास्त भार ठेवत नाही आणि जेव्हा बोलाल, तेव्हा न्याय करा, मग तो जवळचा नातेवाईक का असेना आणि अल्लाहशी केलेला वायदा पूर्ण करा. त्याने तुम्हा लोकांना याचाच आदेश दिला आहे यासाठी की तुम्ही स्मरण राखावे. info
التفاسير:

external-link copy
153 : 6

وَاَنَّ هٰذَا صِرَاطِیْ مُسْتَقِیْمًا فَاتَّبِعُوْهُ ۚ— وَلَا تَتَّبِعُوا السُّبُلَ فَتَفَرَّقَ بِكُمْ عَنْ سَبِیْلِهٖ ؕ— ذٰلِكُمْ وَصّٰىكُمْ بِهٖ لَعَلَّكُمْ تَتَّقُوْنَ ۟

१५३. आणि हाच माझा सरळ मार्ग आहे यास्तव त्यावरच चाला आणि इतर मार्गांवर चालू नका, अन्यथा तुम्हाला त्याच्या मार्गपासून दूर करतील त्याने (अल्लाहने) याचाच आदेश दिला आहे यासाठी की तुम्ही सुरक्षित राहावे. info
التفاسير:

external-link copy
154 : 6

ثُمَّ اٰتَیْنَا مُوْسَی الْكِتٰبَ تَمَامًا عَلَی الَّذِیْۤ اَحْسَنَ وَتَفْصِیْلًا لِّكُلِّ شَیْءٍ وَّهُدًی وَّرَحْمَةً لَّعَلَّهُمْ بِلِقَآءِ رَبِّهِمْ یُؤْمِنُوْنَ ۟۠

१५४. आणि आम्ही (पैगंबर) मूसा यांना ग्रंथ प्रदान केला, त्याच्यावर आपली कृपा देणगी (नेमत) पूर्ण करण्यासाठी, ज्याने सत्कर्मे केलीत आणि प्रत्येक गोष्टीचा तपशील आणि मार्गदर्शन आणि दया कृपाकरिता, यासाठी की त्यांनी आपल्या पालनकर्त्याशी भेट होण्यावर ईमान राखावे. info
التفاسير:

external-link copy
155 : 6

وَهٰذَا كِتٰبٌ اَنْزَلْنٰهُ مُبٰرَكٌ فَاتَّبِعُوْهُ وَاتَّقُوْا لَعَلَّكُمْ تُرْحَمُوْنَ ۟ۙ

१५५. आणि हा (पवित्र कुरआन) एक शुभ ग्रंथ आहे, जो आम्ही अवतरित केला, यास्तव तुम्ही याचे अनुसरण करा, यासाठी की तुमच्यावर दया केली जावी. info
التفاسير:

external-link copy
156 : 6

اَنْ تَقُوْلُوْۤا اِنَّمَاۤ اُنْزِلَ الْكِتٰبُ عَلٰی طَآىِٕفَتَیْنِ مِنْ قَبْلِنَا ۪— وَاِنْ كُنَّا عَنْ دِرَاسَتِهِمْ لَغٰفِلِیْنَ ۟ۙ

१५६. यासाठी की असे न म्हणावे की आमच्या पूर्वी दोन जनसमूहांवर ग्रंथ (तौरात आणि इंजील) अवतरित केले गेले आणि आम्ही त्यांच्या शिकवणीपासून अनभिज्ञ राहिलो. info
التفاسير:

external-link copy
157 : 6

اَوْ تَقُوْلُوْا لَوْ اَنَّاۤ اُنْزِلَ عَلَیْنَا الْكِتٰبُ لَكُنَّاۤ اَهْدٰی مِنْهُمْ ۚ— فَقَدْ جَآءَكُمْ بَیِّنَةٌ مِّنْ رَّبِّكُمْ وَهُدًی وَّرَحْمَةٌ ۚ— فَمَنْ اَظْلَمُ مِمَّنْ كَذَّبَ بِاٰیٰتِ اللّٰهِ وَصَدَفَ عَنْهَا ؕ— سَنَجْزِی الَّذِیْنَ یَصْدِفُوْنَ عَنْ اٰیٰتِنَا سُوْٓءَ الْعَذَابِ بِمَا كَانُوْا یَصْدِفُوْنَ ۟

१५७. किंवा तुम्ही असे न म्हणावे की जर आमच्यावर ग्रंथ अवतरित झाला असता तर आम्ही त्यांच्यापेक्षा अधिक सत्य मार्गावर राहिलो असतो. तेव्हा तुमच्याजवळ तुमच्या पालनकर्त्यातर्फे स्पष्ट प्रमाण आणि मार्गदर्शन व दया येऊन पोहोचली आहे. मग त्याहून जास्त अत्याचारी कोण आहे, ज्याने अल्लाहच्या आयतींना खोटे ठरविले आणि त्यांच्याकडून तोंड फिरविले आम्ही लवकरच अशा लोकांना मोठा सक्त अज़ाब देऊ जे आमच्या आयतींकडून तोंड फिरवितात. info
التفاسير: