Қуръони Карим маъноларининг таржимаси - Маратийча таржима - Муҳаммад Шафий Ансорий

external-link copy
150 : 2

وَمِنْ حَیْثُ خَرَجْتَ فَوَلِّ وَجْهَكَ شَطْرَ الْمَسْجِدِ الْحَرَامِ ؕ— وَحَیْثُ مَا كُنْتُمْ فَوَلُّوْا وُجُوْهَكُمْ شَطْرَهٗ ۙ— لِئَلَّا یَكُوْنَ لِلنَّاسِ عَلَیْكُمْ حُجَّةٌ ۗ— اِلَّا الَّذِیْنَ ظَلَمُوْا مِنْهُمْ ۗ— فَلَا تَخْشَوْهُمْ وَاخْشَوْنِیْ ۗ— وَلِاُتِمَّ نِعْمَتِیْ عَلَیْكُمْ وَلَعَلَّكُمْ تَهْتَدُوْنَ ۟ۙۛ

१५०. आणि ज्या ठिकाणाहूनही तुम्ही निघाल आपले तोंड मस्जिदे हरामकडे करून घ्या आणि ज्या ठिकाणीदेखील तुम्ही राहाल आपले तोंड त्याच्याचकडे (अर्थात काबाकडे) करून घेत जा, यासाठी की लोकांना वाद घालण्याचे कोणतेही प्रमाण बाकी राहू नये, त्यांच्याखेरीज जे यांच्यात अत्याचारी आहेत. तुम्ही त्यांचे भय बाळगू नका, १ फक्त माझेच भय बाळगा, यासाठी की मी आपली कृपा- देणगी (नेमत) तुमच्यावर पूर्ण करावी, आणि यासाठी की तुम्ही मार्गदर्शन प्राप्त करू शकावे. info

(१) अत्याचारींचे भय बाळगू नका म्हणजे अनेकेश्वरवाद्यांच्या कारवायांची काळजी करू नका.

التفاسير: