Қуръони Карим маъноларининг таржимаси - Маратийча таржима - Муҳаммад Шафий Ансорий

Бет рақами:close

external-link copy
26 : 19

فَكُلِیْ وَاشْرَبِیْ وَقَرِّیْ عَیْنًا ۚ— فَاِمَّا تَرَیِنَّ مِنَ الْبَشَرِ اَحَدًا ۙ— فَقُوْلِیْۤ اِنِّیْ نَذَرْتُ لِلرَّحْمٰنِ صَوْمًا فَلَنْ اُكَلِّمَ الْیَوْمَ اِنْسِیًّا ۟ۚ

२६. आता निर्धास्त होऊन खा आणि पी आणि डोळे थंड राख, जर तुला एखादा मनुष्य दिसला तर सांग की मी दयावान अल्लाहच्या नावाने रोजा (उपवास) ठेवला आहे. आज मी कोणत्याही माणसाशी बोलणार नाही. info
التفاسير:

external-link copy
27 : 19

فَاَتَتْ بِهٖ قَوْمَهَا تَحْمِلُهٗ ؕ— قَالُوْا یٰمَرْیَمُ لَقَدْ جِئْتِ شَیْـًٔا فَرِیًّا ۟

२७. आता (हजरत ईसा) यांना घेऊन ती आपल्या लोकांमध्ये आली. सर्वजण म्हणाले, मरियम, तू मोठे वाईट कृत्य केलेस. info
التفاسير:

external-link copy
28 : 19

یٰۤاُخْتَ هٰرُوْنَ مَا كَانَ اَبُوْكِ امْرَاَ سَوْءٍ وَّمَا كَانَتْ اُمُّكِ بَغِیًّا ۟ۖۚ

२८. हे हारुनच्या बहिणी! ना तर तुझा पिता वाईट माणूस होता, आणि ना तुझी आई दुराचारी होती. info
التفاسير:

external-link copy
29 : 19

فَاَشَارَتْ اِلَیْهِ ۫ؕ— قَالُوْا كَیْفَ نُكَلِّمُ مَنْ كَانَ فِی الْمَهْدِ صَبِیًّا ۟

२९. (मरियमने) आपल्या बाळाकडे इशारा केला, सर्व म्हणू लागले, आता कुशीत असलेल्या बाळाशी आम्ही बोलणार तरी कसे. info
التفاسير:

external-link copy
30 : 19

قَالَ اِنِّیْ عَبْدُ اللّٰهِ ۫ؕ— اٰتٰىنِیَ الْكِتٰبَ وَجَعَلَنِیْ نَبِیًّا ۟ۙ

३०. (बाळ) उद्‌गारले, मी सर्वश्रेष्ठ अल्लाहचा दास आहे. त्याने मला ग्रंथ प्रदान केला आहे आणि मला आपला पैगंबर (दूत) बनविले आहे. info
التفاسير:

external-link copy
31 : 19

وَّجَعَلَنِیْ مُبٰرَكًا اَیْنَ مَا كُنْتُ ۪— وَاَوْصٰنِیْ بِالصَّلٰوةِ وَالزَّكٰوةِ مَا دُمْتُ حَیًّا ۟ۙ

३१. आणि त्याने मला शुभ मंगलदायी बनविले आहे, जिथे देखील मी राहीन आणि जोपर्यंत मी जिवंत राहीन तोपर्यंत त्याने मला नमाज आणि जकातचा आदेश दिला आहे. info
التفاسير:

external-link copy
32 : 19

وَّبَرًّا بِوَالِدَتِیْ ؗ— وَلَمْ یَجْعَلْنِیْ جَبَّارًا شَقِیًّا ۟

३२. आणि त्याने मला आपल्या मातेचा सेवक बनविले आहे आणि मला कठोर आणि दुर्दैवी केले नाही. info
التفاسير:

external-link copy
33 : 19

وَالسَّلٰمُ عَلَیَّ یَوْمَ وُلِدْتُّ وَیَوْمَ اَمُوْتُ وَیَوْمَ اُبْعَثُ حَیًّا ۟

३३. आणि माझ्यावर माझ्या जन्माच्या दिवशी आणि माझ्या मृत्युच्या दिवशी आणि ज्या दिवशी मी दुसऱ्यांदा उभा केला जाईन, माझ्यावर शांती-सलामती आहे. info
التفاسير:

external-link copy
34 : 19

ذٰلِكَ عِیْسَی ابْنُ مَرْیَمَ ۚ— قَوْلَ الْحَقِّ الَّذِیْ فِیْهِ یَمْتَرُوْنَ ۟

३४. ही आहे सच्ची कहाणी मरियमचा पुत्र ईसाची. हीच ती सत्य गोष्टहोय, ज्याबाबत लोक संशयात पडले आहेत. info
التفاسير:

external-link copy
35 : 19

مَا كَانَ لِلّٰهِ اَنْ یَّتَّخِذَ مِنْ وَّلَدٍ ۙ— سُبْحٰنَهٗ ؕ— اِذَا قَضٰۤی اَمْرًا فَاِنَّمَا یَقُوْلُ لَهٗ كُنْ فَیَكُوْنُ ۟ؕ

३५. अल्लाहकरिता संतती असणे उचित नाही तो तर अतिशय पवित्र आहे तो जेव्हा एखाद्या कामाचा संकल्प करतो तेव्हा त्यासाठी म्हणतो होऊन जा आणि त्या क्षणी ते घडून येते. info
التفاسير:

external-link copy
36 : 19

وَاِنَّ اللّٰهَ رَبِّیْ وَرَبُّكُمْ فَاعْبُدُوْهُ ؕ— هٰذَا صِرَاطٌ مُّسْتَقِیْمٌ ۟

३६. आणि माझा आणि तुम्हा सर्वांचा पालनकर्ता अल्लाहच आहे. तेव्हा तुम्ही सर्व त्याचीच उपासना करा, हाच सरळ मार्ग आहे. info
التفاسير:

external-link copy
37 : 19

فَاخْتَلَفَ الْاَحْزَابُ مِنْ بَیْنِهِمْ ۚ— فَوَیْلٌ لِّلَّذِیْنَ كَفَرُوْا مِنْ مَّشْهَدِ یَوْمٍ عَظِیْمٍ ۟

३७. मग (हे) गट आपसात मतभेद करू लागले. तथापि काफिरांसाठी दुःख आहे एका भयंकर दिवसाच्या येण्याने. info
التفاسير:

external-link copy
38 : 19

اَسْمِعْ بِهِمْ وَاَبْصِرْ ۙ— یَوْمَ یَاْتُوْنَنَا لٰكِنِ الظّٰلِمُوْنَ الْیَوْمَ فِیْ ضَلٰلٍ مُّبِیْنٍ ۟

३८. किती चांगले पाहणारे ऐकणारे असतील त्या दिवशी, जेव्हा आमच्यासमोर हजर होतील, परंतु आज तर हे अत्याचारी लोक उघड अशा मार्गभ्रष्टतेत पडले आहेत. info
التفاسير: