قرآن کریم کے معانی کا ترجمہ - مراٹھی ترجمہ - محمد شفیع انصاری

external-link copy
4 : 71

یَغْفِرْ لَكُمْ مِّنْ ذُنُوْبِكُمْ وَیُؤَخِّرْكُمْ اِلٰۤی اَجَلٍ مُّسَمًّی ؕ— اِنَّ اَجَلَ اللّٰهِ اِذَا جَآءَ لَا یُؤَخَّرُ ۘ— لَوْ كُنْتُمْ تَعْلَمُوْنَ ۟

४. तर तो तुमचे अपराध माफ करील, आणि तुम्हाला एका निर्धारित वेळे पर्यर्ंत सवड देईल.१ निःसंशय, अल्लाहचा वायदा (निर्धारित समय) जेव्हा येतो, तेव्हा तो टळत नाही. तुम्हाला हे माहीत असते तर (बरे झाले असते!) info

(१) अर्थात ईमान राखण्याच्या स्थितीत, तुमच्या मृत्युचा आणि जो निर्धारित आहे, तो टळून तुम्हाला दीर्घायुष्य प्रदान करील आणि तो अज़ाब तुमच्यावरून दूर करील, जो ईमान न राखण्याच्या स्थितीत तुमच्या नशिबी होता. या आयतीद्वारे हे सांगितले गेले आहे की, आज्ञापालन, सत्कर्म व सदाचरण, नातेवाईकांशी सद्‌व्यवहार केल्याने आयुष्य वाढते. हदीसमधील उल्लेखानुसार ‘मिल्लतुर्रहीमी तज़िजुफील उमुर.’ ‘‘नातेवाईकांशी सद्‌व्यवहार आयुष्य वाढण्याचे कारण आहे.’’ (इब्ने कसीर)

التفاسير: