(१) ही त्या वेळेची घटना आहे जेव्हा हजरत मूसा त्यांच्याजवळ तौरात ग्रंथ घेऊन आले आणि त्यांना त्यातले आदेश सांगितले, तेव्हा त्यांनी आपल्या चरित्र्यानुसार त्या आदेशांवर आचरण करणे मान्य केले नाही आणि अवज्ञा केली, ज्यामुळे सर्वश्रेष्ठ अल्लाहने त्यांच्या शिरावर पर्वत आणून उभा केला की तुमच्यावर कोसळवून तुमचा चेंदा मेंदा केला जाईल. त्याचे भय राखून त्यांनी वचन दिले की आता आम्ही तौरातच्या आदेशानुसारच आचरण करू.