قرآن کریم کے معانی کا ترجمہ - مراٹھی ترجمہ - محمد شفیع انصاری

external-link copy
59 : 6

وَعِنْدَهٗ مَفَاتِحُ الْغَیْبِ لَا یَعْلَمُهَاۤ اِلَّا هُوَ ؕ— وَیَعْلَمُ مَا فِی الْبَرِّ وَالْبَحْرِ ؕ— وَمَا تَسْقُطُ مِنْ وَّرَقَةٍ اِلَّا یَعْلَمُهَا وَلَا حَبَّةٍ فِیْ ظُلُمٰتِ الْاَرْضِ وَلَا رَطْبٍ وَّلَا یَابِسٍ اِلَّا فِیْ كِتٰبٍ مُّبِیْنٍ ۟

५९. आणि त्या (अल्लाह) कडेच परोक्षाच्या चाव्या आहेत, ज्यांना फक्त तोच जाणतो आणि जे काही धरतीवर आणि जलाशयात आहे ते सर्व तो जाणतो आणि जमिनीच्या अंधःकारात एक दाणाही खाली पडत नाही. आणि ना एखादी ओली व कोरडी वस्तू पडते, परंतु हे सर्व काही स्पष्ट ग्रंथात नमूद आहे.१ info

(१) स्पष्ट ग्रंथाशी अभिप्रेत ‘सुरक्षित ग्रंथ’ या आयतीद्वारे हे स्पष्ट कळते की गैब (परोक्ष) चे ज्ञान फक्त अल्लाहलाच आहे. समस्त परोक्षा-खजिना त्याच्याचजवळ आहे. यास्तव कृतघ्न, अनेकेश्वरवादी आणि विरोधी लोकांवर केव्हा अज़ाब टाकायचा तेही अल्लाह जाणतो. हदीसमधील उल्लेखानुसार परोक्ष गोष्टी पाच आहेत? १. खयामतचे ज्ञान. २. पर्जन्यवृष्टी. ३. मातेच्या गर्भातले मूल. ४. उद्या घडणारी घटना. ५. मृत्यु कोणत्या जागी होईल. या पाचही गोष्टींचे ज्ञान फक्त अल्लाहला आहे. (सही बुखारी : तफसीर सूरह अल अनआम)

التفاسير: