قرآن کریم کے معانی کا ترجمہ - مراٹھی ترجمہ - محمد شفیع انصاری

صفحہ نمبر:close

external-link copy
3 : 25

وَاتَّخَذُوْا مِنْ دُوْنِهٖۤ اٰلِهَةً لَّا یَخْلُقُوْنَ شَیْـًٔا وَّهُمْ یُخْلَقُوْنَ وَلَا یَمْلِكُوْنَ لِاَنْفُسِهِمْ ضَرًّا وَّلَا نَفْعًا وَّلَا یَمْلِكُوْنَ مَوْتًا وَّلَا حَیٰوةً وَّلَا نُشُوْرًا ۟

३. आणि त्या लोकांनी अल्लाहखेरीज ज्यांना आपले आराध्य दैवत बनवून ठेवले आहे, ते कोणतीही वस्तू निर्माण करू शकत नाही, किंबहुना ते स्वतः(एखाद्याकडून) निर्माण केले जातात ते स्वतः आपल्या लाभ-हानिचा अधिकार बाळगत नाहीत आणि ना जीवन-मृत्युचा आणि ना दुसऱ्यांदा जिवंत होऊन उठण्याचे ते मालक आहेत. info
التفاسير:

external-link copy
4 : 25

وَقَالَ الَّذِیْنَ كَفَرُوْۤا اِنْ هٰذَاۤ اِلَّاۤ اِفْكُ ١فْتَرٰىهُ وَاَعَانَهٗ عَلَیْهِ قَوْمٌ اٰخَرُوْنَ ۛۚ— فَقَدْ جَآءُوْ ظُلْمًا وَّزُوْرًا ۟ۚۛ

४. आणि काफिर (इन्कारी) लोक म्हणाले, हे तर केवळ त्याने स्वतः रचलेले असत्य आहे ज्या कामात दुसऱ्या लोकांनीही त्याला मदत केली आहे. वस्तुतः हे काफिर मोठे अत्याचारी आणि निव्वळ असत्य आणणारे बनलेत. info
التفاسير:

external-link copy
5 : 25

وَقَالُوْۤا اَسَاطِیْرُ الْاَوَّلِیْنَ اكْتَتَبَهَا فَهِیَ تُمْلٰی عَلَیْهِ بُكْرَةً وَّاَصِیْلًا ۟

५. आणि ते असेही म्हणाले की या तर पूर्वी होऊन गेलेल्या लोकांच्या कथा-कहाण्या आहेत, ज्या त्याने लिहून ठेवल्या आहेत, आणि त्याच सकाळ-संध्याकाळ त्याच्यासमोर वाचल्या जातात. info
التفاسير:

external-link copy
6 : 25

قُلْ اَنْزَلَهُ الَّذِیْ یَعْلَمُ السِّرَّ فِی السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ ؕ— اِنَّهٗ كَانَ غَفُوْرًا رَّحِیْمًا ۟

६. सांगा, याला तर त्या अल्लाहने अवतरित केले आहे, जो आकाश व धरतीच्या सर्व लपलेल्या गोष्टी जाणतो. निःसंशय तो मोठा माफ करणारा आणि दया करणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
7 : 25

وَقَالُوْا مَالِ هٰذَا الرَّسُوْلِ یَاْكُلُ الطَّعَامَ وَیَمْشِیْ فِی الْاَسْوَاقِ ؕ— لَوْلَاۤ اُنْزِلَ اِلَیْهِ مَلَكٌ فَیَكُوْنَ مَعَهٗ نَذِیْرًا ۟ۙ

७. आणि ते म्हणाले की हा कसा पैगंबर आहे की भोजन करतो आणि बाजारात चालतो फिरतो, त्याच्याजवळ एखादा फरिश्ता का नाही पाठविला जात की तो देखील त्याच्या सोबतीला राहून खबरदार करणारा बनला असता. info
التفاسير:

external-link copy
8 : 25

اَوْ یُلْقٰۤی اِلَیْهِ كَنْزٌ اَوْ تَكُوْنُ لَهٗ جَنَّةٌ یَّاْكُلُ مِنْهَا ؕ— وَقَالَ الظّٰلِمُوْنَ اِنْ تَتَّبِعُوْنَ اِلَّا رَجُلًا مَّسْحُوْرًا ۟

८. किंवा त्याच्याजवळ एखादा खजिनाच टाकला गेला असता किंवा त्याची एखादी बाग तरी असती, ज्यातून तो खात राहिला असता. आणि त्या अत्याचारी लोकांनी म्हटले की तुम्ही तर अशा माणसाच्या मागे चालू लागलात, ज्याच्यावर जादू-टोणा केला गेला आहे. info
التفاسير:

external-link copy
9 : 25

اُنْظُرْ كَیْفَ ضَرَبُوْا لَكَ الْاَمْثَالَ فَضَلُّوْا فَلَا یَسْتَطِیْعُوْنَ سَبِیْلًا ۟۠

९. जरा विचार करा, हे लोक तुमच्याविषयी कसकशा गोष्टी बोलत आहेत की ज्यामुळे स्वतःच मार्गभ्रष्ट होत आहेत आणि कशाही प्रकारे मार्गावर येऊ शकत नाही. info
التفاسير:

external-link copy
10 : 25

تَبٰرَكَ الَّذِیْۤ اِنْ شَآءَ جَعَلَ لَكَ خَیْرًا مِّنْ ذٰلِكَ جَنّٰتٍ تَجْرِیْ مِنْ تَحْتِهَا الْاَنْهٰرُ ۙ— وَیَجْعَلْ لَّكَ قُصُوْرًا ۟

१०. अल्लाह तर असा समृद्धशाली आहे की त्याने इच्छिल्यास तुम्हाला अशा अनेक बागा प्रदान करील, ज्या त्यांनी सांगितलेल्या बागांपेक्षा खूप चांगल्या असतील, ज्यांच्या खाली प्रवाह वाहत असावेत आणि तुम्हाला अनेक पक्के महाल देखील प्रदान करील. info
التفاسير:

external-link copy
11 : 25

بَلْ كَذَّبُوْا بِالسَّاعَةِ وَاَعْتَدْنَا لِمَنْ كَذَّبَ بِالسَّاعَةِ سَعِیْرًا ۟ۚ

११. खरी गोष्ट अशी की लोक कयामतला खोटे समजतात आणि कयामतला खोटे ठरविणाऱ्यांकरिता आम्ही धगधगणारी आग तयार करून ठेवली आहे. info
التفاسير: