(१) ज्या प्रकारे पोहणारा इसम पाण्यावर तरंगत असतो, तद्वतच चंद्र आणि सूर्य आपापल्या कक्षेत आपल्या निर्धारीत गतीने भ्रमण करतात.
(१) हे अविश्वासी लोकांच्या उत्तरादाखल आहे जे पैगंबर (स.) विषयी म्हणत की एक दिवस तुम्ही मरणारच आहात. त्यावर अल्लाहने फर्माविले की मृत्यु प्रत्येकाला येणार आहे. तेव्हा या नियमाला पैगंबर देखील अपवाद नाहीत, कारण तेही एक मानव आहेत आणि आम्ही कोणालाही सदैव काळ जिवंत राहण्यासाठी सोडले नाही, तेव्हा बोलणारेही नेहमीसाठी इथे राहणार नाहीत. याद्वारे मूर्तीपूजक आणि कबरींची पूजा करणाऱ्यांचेही खंडन झाले, जे देवता, पैगंबर आणि थोर बुजूर्गांच्या सदैव जिवंत असण्याचा भ्रम राखतात आणि या श्रद्धेच्या आधारावर त्यांना आपला दुःखनिवारक, संकटविमोचक, मुश्किलकुशा वगैरे समजतात. या चुकीच्या धारणेपासून सर्वश्रेष्ठ अल्लाह आमचे रक्षण करो.