قرآن کریم کے معانی کا ترجمہ - مراٹھی ترجمہ - محمد شفیع انصاری

external-link copy
221 : 2

وَلَا تَنْكِحُوا الْمُشْرِكٰتِ حَتّٰی یُؤْمِنَّ ؕ— وَلَاَمَةٌ مُّؤْمِنَةٌ خَیْرٌ مِّنْ مُّشْرِكَةٍ وَّلَوْ اَعْجَبَتْكُمْ ۚ— وَلَا تُنْكِحُوا الْمُشْرِكِیْنَ حَتّٰی یُؤْمِنُوْا ؕ— وَلَعَبْدٌ مُّؤْمِنٌ خَیْرٌ مِّنْ مُّشْرِكٍ وَّلَوْ اَعْجَبَكُمْ ؕ— اُولٰٓىِٕكَ یَدْعُوْنَ اِلَی النَّارِ ۖۚ— وَاللّٰهُ یَدْعُوْۤا اِلَی الْجَنَّةِ وَالْمَغْفِرَةِ بِاِذْنِهٖ ۚ— وَیُبَیِّنُ اٰیٰتِهٖ لِلنَّاسِ لَعَلَّهُمْ یَتَذَكَّرُوْنَ ۟۠

२२१. आणि अनेकेश्वरवादी स्त्रियांशी तोपर्यंत विवाह करू नका, जोपर्यंत त्या ईमान स्वीकारत नाहीत. ईमानधारक दासी अनेकेश्वरवादी स्वतंत्र स्त्रीपेक्षा अधिक चांगली आहे. जरी तुम्हाला आनेकेश्वरवादी स्त्री कितीही चांगली वाटत असली तरीही, आणि ना अनेकेश्वरवादी पुरुषांना आपल्या (ईमानधारक) स्त्रियांशी विवाह करू द्या, जोपर्यंत ते ईमान स्वीकारीत नाही. ईमानधारक गुलाम (मुस्लिम दास) स्वतंत्र (गुलाम नसलेल्या) अनेकेश्वरवादी पुरुषापेक्षा अधिक चांगला आहे, जरी तुम्हाला अनेकेश्वरवादी खूप चांगला वाटत असला तरीही. हे लोक जहन्नमकडे बोलवितात, आणि अल्लाह जन्नतकडे आणि माफीकडे आपल्या हुकूमाने बोलवितो. तो आपल्या निशाण्या लोकांकरिता स्पष्टपणे सांगतो, यासाठी की त्यांनी बोध (उपदेश) प्राप्त करावा. info
التفاسير: