قرآن کریم کے معانی کا ترجمہ - مراٹھی ترجمہ - محمد شفیع انصاری

صفحہ نمبر:close

external-link copy
113 : 2

وَقَالَتِ الْیَهُوْدُ لَیْسَتِ النَّصٰرٰی عَلٰی شَیْءٍ ۪— وَّقَالَتِ النَّصٰرٰی لَیْسَتِ الْیَهُوْدُ عَلٰی شَیْءٍ ۙ— وَّهُمْ یَتْلُوْنَ الْكِتٰبَ ؕ— كَذٰلِكَ قَالَ الَّذِیْنَ لَا یَعْلَمُوْنَ مِثْلَ قَوْلِهِمْ ۚ— فَاللّٰهُ یَحْكُمُ بَیْنَهُمْ یَوْمَ الْقِیٰمَةِ فِیْمَا كَانُوْا فِیْهِ یَخْتَلِفُوْنَ ۟

११३. यहूदी म्हणतात, ख्रिश्चन उचित मार्गावर नाहीत आणि ख्रिश्चन म्हणतात की यहूदी उचित मार्गावर नाहीत. वास्तविक हे तौरातचे वाचन करतात अशा प्रकारे यांच्यासारखी गोष्ट अज्ञानी लोकही बोलतात. कयामतीच्या दिवशी अल्लाह यांच्या या मतभेदाचा फैसला करील. info
التفاسير:

external-link copy
114 : 2

وَمَنْ اَظْلَمُ مِمَّنْ مَّنَعَ مَسٰجِدَ اللّٰهِ اَنْ یُّذْكَرَ فِیْهَا اسْمُهٗ وَسَعٰی فِیْ خَرَابِهَا ؕ— اُولٰٓىِٕكَ مَا كَانَ لَهُمْ اَنْ یَّدْخُلُوْهَاۤ اِلَّا خَآىِٕفِیْنَ ؕ۬— لَهُمْ فِی الدُّنْیَا خِزْیٌ وَّلَهُمْ فِی الْاٰخِرَةِ عَذَابٌ عَظِیْمٌ ۟

११४. आणि त्याहून मोठा अत्याचारी कोण आहे? जो अल्लाहच्या मस्जिदीमध्ये अल्लाहचे स्मरण करण्यापासून रोखील, आणि त्यांना उजाडण्याचा प्रयत्न करील? अशा लोकांनी अल्लाहचे भय राखत, त्यात दाखल झाले पाहिजे. त्यांच्याकरिता या जगातही अपमान आहे आणि आखिरत (मरणोत्तर जीवन) मध्येही मोठमोठ्या शिक्षा-यातना आहेत. info
التفاسير:

external-link copy
115 : 2

وَلِلّٰهِ الْمَشْرِقُ وَالْمَغْرِبُ ۗ— فَاَیْنَمَا تُوَلُّوْا فَثَمَّ وَجْهُ اللّٰهِ ؕ— اِنَّ اللّٰهَ وَاسِعٌ عَلِیْمٌ ۟

११५. आणि पूर्व आणि पश्चिमेचा स्वामी अल्लाहच आहे. तुम्ही जिकडे देखील तोंड कराल, तिकडे अल्लाहचे तोंड आहे. अल्लाह अतिशय सामर्थ्यशाली खूप खूप जाणणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
116 : 2

وَقَالُوا اتَّخَذَ اللّٰهُ وَلَدًا ۙ— سُبْحٰنَهٗ ؕ— بَلْ لَّهٗ مَا فِی السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ ؕ— كُلٌّ لَّهٗ قٰنِتُوْنَ ۟

११६. आणि हे म्हणतात की अल्लाहला संतान आहे (मुळीच नाही, किंबहुना) तो पवित्र (व्यंग-दोष विरहीत) आहे. धरती आणि आकाशांच्या समस्त निर्मितीवर त्याची शासन-सत्ता आहे आणि प्रत्येक त्याचा आज्ञाधारक आहे. info
التفاسير:

external-link copy
117 : 2

بَدِیْعُ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ ؕ— وَاِذَا قَضٰۤی اَمْرًا فَاِنَّمَا یَقُوْلُ لَهٗ كُنْ فَیَكُوْنُ ۟

११७. तो, आकाशांना व धरतीला नव्याने बनवून उत्पन्न करणारा आहे, आणि तो ज्या कामाचा निर्णय घेतो, तेव्हा म्हणतो, होऊन जा आणि ते काम होते. info
التفاسير:

external-link copy
118 : 2

وَقَالَ الَّذِیْنَ لَا یَعْلَمُوْنَ لَوْلَا یُكَلِّمُنَا اللّٰهُ اَوْ تَاْتِیْنَاۤ اٰیَةٌ ؕ— كَذٰلِكَ قَالَ الَّذِیْنَ مِنْ قَبْلِهِمْ مِّثْلَ قَوْلِهِمْ ؕ— تَشَابَهَتْ قُلُوْبُهُمْ ؕ— قَدْ بَیَّنَّا الْاٰیٰتِ لِقَوْمٍ یُّوْقِنُوْنَ ۟

११८. आणि अशा प्रकारे अडाणी-अशिक्षित लोकदेखील म्हणाले की स्वतः अल्लाह आमच्याशी संभाषण का नाही करीत किंवा आमच्याजवळ एखादी निशाणी का नाही येत. अशा प्रकारचे कथन त्यांच्या पूर्वीच्या लोकांनीही केले होते, त्यांची आणि यांची मने एकसमान झालीत. आम्ही तर विश्वास (श्रद्धा) ठेवणाऱ्यांकरिता निशाण्यांचे निवेदन केले आहे. info
التفاسير:

external-link copy
119 : 2

اِنَّاۤ اَرْسَلْنٰكَ بِالْحَقِّ بَشِیْرًا وَّنَذِیْرًا ۙ— وَّلَا تُسْـَٔلُ عَنْ اَصْحٰبِ الْجَحِیْمِ ۟

११९. आम्ही तुम्हाला सत्यासह खूशखबर देणारा आणि सचेत करणारा बनवून पाठविले आहे आणि जहन्नमी लोकांविषयी तुम्हाला विचारणा केली जाणार नाही. info
التفاسير: