قرآن کریم کے معانی کا ترجمہ - مراٹھی ترجمہ - محمد شفیع انصاری

صفحہ نمبر: 231:221 close

external-link copy
89 : 11

وَیٰقَوْمِ لَا یَجْرِمَنَّكُمْ شِقَاقِیْۤ اَنْ یُّصِیْبَكُمْ مِّثْلُ مَاۤ اَصَابَ قَوْمَ نُوْحٍ اَوْ قَوْمَ هُوْدٍ اَوْ قَوْمَ صٰلِحٍ ؕ— وَمَا قَوْمُ لُوْطٍ مِّنْكُمْ بِبَعِیْدٍ ۟

८९. आणि हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! कदाचित असे न व्हावे की तुम्ही माझ्या विरोधात येऊन त्या शिक्षा-यातनांना पात्र ठरावे ज्या नूहच्या जनसमूहावर आणि हूदच्या जनसमूहावर आणि सालेहच्या जनसमूहावर आल्या आणि लूतचा जनसमूह तर तुमच्यापासून किंचितही दूर नाही! info
التفاسير:

external-link copy
90 : 11

وَاسْتَغْفِرُوْا رَبَّكُمْ ثُمَّ تُوْبُوْۤا اِلَیْهِ ؕ— اِنَّ رَبِّیْ رَحِیْمٌ وَّدُوْدٌ ۟

९०. आणि तुम्ही आपल्या पालनकर्त्याजवळ माफी मागा आणि त्याच्याचकडे झुका. निश्चितच माझा पालनकर्ता अतिशय दयावान आणि खूप प्रेम करणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
91 : 11

قَالُوْا یٰشُعَیْبُ مَا نَفْقَهُ كَثِیْرًا مِّمَّا تَقُوْلُ وَاِنَّا لَنَرٰىكَ فِیْنَا ضَعِیْفًا ۚ— وَلَوْلَا رَهْطُكَ لَرَجَمْنٰكَ ؗ— وَمَاۤ اَنْتَ عَلَیْنَا بِعَزِیْزٍ ۟

९१. ते (लोक) म्हणाले, हे शुऐब! तुमच्या बहुतेक गोष्टी आम्हाला समजत नाही आणि आम्ही तुम्हाला आपल्या दरम्यान खूप कमकुवत असल्याचे पाहतो. जर तुमच्या कबिल्याविषयी आदर नसता तर आम्ही तुमच्यावर दगडफेक केली असती आणि आम्ही तुम्हाला एखादा प्रतिष्ठित मनुष्य समजत नाही. info
التفاسير:

external-link copy
92 : 11

قَالَ یٰقَوْمِ اَرَهْطِیْۤ اَعَزُّ عَلَیْكُمْ مِّنَ اللّٰهِ ؕ— وَاتَّخَذْتُمُوْهُ وَرَآءَكُمْ ظِهْرِیًّا ؕ— اِنَّ رَبِّیْ بِمَا تَعْمَلُوْنَ مُحِیْطٌ ۟

९२. शुऐब म्हणाले, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! काय तुमच्या दृष्टीने माझ्या कबिल्याचे लोक अल्लाहपेक्षा जास्त सन्मानित आहेत की (ज्यामुळे) तुम्ही त्याला पाठीमागे टाकले आहे. निःसंशय, तुम्ही जे काही करीत आहात, माझ्या पालनकर्त्याने ते सर्व घेरलेले आहे. info
التفاسير:

external-link copy
93 : 11

وَیٰقَوْمِ اعْمَلُوْا عَلٰی مَكَانَتِكُمْ اِنِّیْ عَامِلٌ ؕ— سَوْفَ تَعْلَمُوْنَ ۙ— مَنْ یَّاْتِیْهِ عَذَابٌ یُّخْزِیْهِ وَمَنْ هُوَ كَاذِبٌ ؕ— وَارْتَقِبُوْۤا اِنِّیْ مَعَكُمْ رَقِیْبٌ ۟

९३. आणि हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! आता तुम्ही आपल्या ठिकाणी काम करीत राहा, मीदेखील काम करीत आहे. लवकरच तुम्हाला माहीत पडेल की कोणाकडे तो अज़ाब येतो, जो त्याला अपमानित करून टाकील आणि असा कोण आहे जो खोटा आहे? तुम्ही प्रतिक्षा करा आणि मीदेखील तुमच्यासोबत प्रतिक्षा करीत आहे. info
التفاسير:

external-link copy
94 : 11

وَلَمَّا جَآءَ اَمْرُنَا نَجَّیْنَا شُعَیْبًا وَّالَّذِیْنَ اٰمَنُوْا مَعَهٗ بِرَحْمَةٍ مِّنَّا وَاَخَذَتِ الَّذِیْنَ ظَلَمُوا الصَّیْحَةُ فَاَصْبَحُوْا فِیْ دِیَارِهِمْ جٰثِمِیْنَ ۟ۙ

९४. आणि जेव्हा आमचा आदेश (अज़ाब) येऊन पोहोचला, आम्ही शुऐबला आणि त्यांच्यासह समस्त ईमानधारकांना आपल्या खास कृपेने मुक्ती प्रदान केली आणि अत्याचारी लोकांना मोठ्या भयंकर आवाजाच्या अज़ाबाने येऊन धरले१ ज्यामुळे ते आपल्या घरांमध्ये पालथे पडून राहिले. info

(१) याच भयंकर चित्काराने त्यांच्या हृदयाची शकले झाली आणि ते मरण पावलेत. त्यानंतर भूकंपही आला. असाच उल्लेख सूरह आराफ-९१ आणि सूरह अनकबूत-३७ मध्ये आहे.

التفاسير:

external-link copy
95 : 11

كَاَنْ لَّمْ یَغْنَوْا فِیْهَا ؕ— اَلَا بُعْدًا لِّمَدْیَنَ كَمَا بَعِدَتْ ثَمُوْدُ ۟۠

९५. जणू काही ते त्या घरांमध्ये कधी राहिलेच नव्हते. सावध राहा! मदयनकरिताही तसाच दुरावा असो, जसा दुरावा समूदसाठी झाला. info
التفاسير:

external-link copy
96 : 11

وَلَقَدْ اَرْسَلْنَا مُوْسٰی بِاٰیٰتِنَا وَسُلْطٰنٍ مُّبِیْنٍ ۟ۙ

९६. आणि निःसंशय, आम्हीच मूसाला आपल्या आयती आणि स्पष्ट प्रमाणांसह पाठविले होते. info
التفاسير:

external-link copy
97 : 11

اِلٰی فِرْعَوْنَ وَمَلَاۡىِٕهٖ فَاتَّبَعُوْۤا اَمْرَ فِرْعَوْنَ ۚ— وَمَاۤ اَمْرُ فِرْعَوْنَ بِرَشِیْدٍ ۟

९७. फिरऔन आणि त्याच्या सरदारांकडे, तरीही त्या लोकांनी फिरऔनच्या आदेशांचे पालन केले आणि फिरऔनचा कोणताही आदेश उचित आणि रास्त नव्हता. info
التفاسير: