قۇرئان كەرىم مەنىلىرىنىڭ تەرجىمىسى - مارتىنچە تەرجىمىسى - مۇھەممەد شەپىيئ ئەنسارى

بەت نومۇرى:close

external-link copy
31 : 78

اِنَّ لِلْمُتَّقِیْنَ مَفَازًا ۟ۙ

३१. निःसंशय, अल्लाहचे भय राखणाऱ्यांकरिता सफलता आहे. info
التفاسير:

external-link copy
32 : 78

حَدَآىِٕقَ وَاَعْنَابًا ۟ۙ

३२. बागा आहेत आणि द्राक्षे आहेत. info
التفاسير:

external-link copy
33 : 78

وَّكَوَاعِبَ اَتْرَابًا ۟ۙ

३३. आणि नवयुवती कुमारिका समवयस्क स्त्रिया आहेत. info
التفاسير:

external-link copy
34 : 78

وَّكَاْسًا دِهَاقًا ۟ؕ

३४. आणि भरून वाहणारे मद्याचे प्याले आहेत. info
التفاسير:

external-link copy
35 : 78

لَا یَسْمَعُوْنَ فِیْهَا لَغْوًا وَّلَا كِذّٰبًا ۟ۚۖ

३५. तिथे ना तर ते अश्लील गोष्टी ऐकतील आणि ना खोट्या गोष्टी ऐकतील. info
التفاسير:

external-link copy
36 : 78

جَزَآءً مِّنْ رَّبِّكَ عَطَآءً حِسَابًا ۟ۙ

३६. (त्यांना) तुमच्या पालनकर्त्यातर्फे (त्यांच्या सत्कर्मांचा) हा मोबदला मिळेल, जो फार मोठे बक्षीस असेल. info
التفاسير:

external-link copy
37 : 78

رَّبِّ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ وَمَا بَیْنَهُمَا الرَّحْمٰنِ لَا یَمْلِكُوْنَ مِنْهُ خِطَابًا ۟ۚ

३७. (त्या) पालनकर्त्यातर्फे मिळेल, जो आकाशांचा आणि जमिनीचा, आणि जे काही त्यांच्या दरम्यान आहे, त्या सर्वांचा स्वामी व पालनकर्ता आहे, आणि मोठा दयावान आहे. कोणालाही त्याच्याशी बोलण्याचा अधिकार नसेल. info
التفاسير:

external-link copy
38 : 78

یَوْمَ یَقُوْمُ الرُّوْحُ وَالْمَلٰٓىِٕكَةُ صَفًّا ۙۗؕ— لَّا یَتَكَلَّمُوْنَ اِلَّا مَنْ اَذِنَ لَهُ الرَّحْمٰنُ وَقَالَ صَوَابًا ۟

३८. ज्या दिवशी रुह (आत्मा) आणि फरिश्ते रांगा बांधून उभे असतील तेव्हा कोणी बोलू शकणार नाही, मात्र ज्याला अतिशय दयावान (रहमान) अनुमती देईल, आणि तो उचित गोष्ट तोंडातून काढील (बोलेल). info
التفاسير:

external-link copy
39 : 78

ذٰلِكَ الْیَوْمُ الْحَقُّ ۚ— فَمَنْ شَآءَ اتَّخَذَ اِلٰی رَبِّهٖ مَاٰبًا ۟

३९. हा दिवस सत्य आहे, आता ज्याची इच्छा असेल त्याने आपल्या पालनकर्त्याजवळ (सत्कर्मे करून) स्थान बनवावे. info
التفاسير:

external-link copy
40 : 78

اِنَّاۤ اَنْذَرْنٰكُمْ عَذَابًا قَرِیْبًا ۖۚ۬— یَّوْمَ یَنْظُرُ الْمَرْءُ مَا قَدَّمَتْ یَدٰهُ وَیَقُوْلُ الْكٰفِرُ یٰلَیْتَنِیْ كُنْتُ تُرٰبًا ۟۠

४०. आम्ही तुम्हाला निकट भविष्यात घडून येणाऱ्या शिक्षा यातनेचे भय दाखविले (आणि सावध केले) ज्या दिवशी मनुष्य आपल्या हातांनी केलेल्या कमाई (कर्मा) ला पाहील आणि काफिर म्हणेल की, मी माती झालो असतो तर (बरे झाले असते)! info
التفاسير: