قۇرئان كەرىم مەنىلىرىنىڭ تەرجىمىسى - مارتىنچە تەرجىمىسى - مۇھەممەد شەپىيئ ئەنسارى

ئەھقاپ

external-link copy
1 : 46

حٰمٓ ۟ۚ

१. हा मीम. info
التفاسير:

external-link copy
2 : 46

تَنْزِیْلُ الْكِتٰبِ مِنَ اللّٰهِ الْعَزِیْزِ الْحَكِیْمِ ۟

२. या ग्रंथाला अवतरित करणे, जबरदस्त हिकमत (बुद्धिकौशल्य) बाळगणाऱ्या अल्लाहतर्फे आहे. info
التفاسير:

external-link copy
3 : 46

مَا خَلَقْنَا السَّمٰوٰتِ وَالْاَرْضَ وَمَا بَیْنَهُمَاۤ اِلَّا بِالْحَقِّ وَاَجَلٍ مُّسَمًّی ؕ— وَالَّذِیْنَ كَفَرُوْا عَمَّاۤ اُنْذِرُوْا مُعْرِضُوْنَ ۟

३. आम्ही आकाशांना आणि धरतीला आणि त्या दोघांच्या दरम्यानच्या समस्त वस्तूंना अति उत्तम योजनेसह निर्धारित अवधीकरिता बनविले आहे आणि काफिर लोकांना ज्या गोष्टीचे भय दाखविले जाते तिच्यापासून तोंड फिरवितात. info
التفاسير:

external-link copy
4 : 46

قُلْ اَرَءَیْتُمْ مَّا تَدْعُوْنَ مِنْ دُوْنِ اللّٰهِ اَرُوْنِیْ مَاذَا خَلَقُوْا مِنَ الْاَرْضِ اَمْ لَهُمْ شِرْكٌ فِی السَّمٰوٰتِ ؕ— اِیْتُوْنِیْ بِكِتٰبٍ مِّنْ قَبْلِ هٰذَاۤ اَوْ اَثٰرَةٍ مِّنْ عِلْمٍ اِنْ كُنْتُمْ صٰدِقِیْنَ ۟

४. (तुम्ही) सांगा की, बरे ज्यांना तुम्ही अल्लाहखेरीज पुकारता, मलाही दाखवा की त्यांनी जमिनीचा कोणता हिस्सा बनविला आहे किंवा आकाशांमध्ये त्यांचा कोणता हिस्सा आहे? जर तुम्ही सच्चे असाल तर याच्या पूर्वीचाच एवादा ग्रंथ किंवा एखादे ज्ञान, जे उद्‌धृत केले जात असेल, माझ्याजवळ आणा. info
التفاسير:

external-link copy
5 : 46

وَمَنْ اَضَلُّ مِمَّنْ یَّدْعُوْا مِنْ دُوْنِ اللّٰهِ مَنْ لَّا یَسْتَجِیْبُ لَهٗۤ اِلٰی یَوْمِ الْقِیٰمَةِ وَهُمْ عَنْ دُعَآىِٕهِمْ غٰفِلُوْنَ ۟

५. आणि त्याहून जास्त मार्गभ्रष्ट दुसरा कोण असेल, जो अल्लाहखेरीज अशांना पुकारतो, जे कयामतपर्यंत त्याची दुआ - प्रार्थना कबूल करू शकणार नाहीत, उलट त्याच्या पुकारण्यापासून गाफीलच असावेत. info
التفاسير: