قۇرئان كەرىم مەنىلىرىنىڭ تەرجىمىسى - مارتىنچە تەرجىمىسى - مۇھەممەد شەپىيئ ئەنسارى

external-link copy
10 : 42

وَمَا اخْتَلَفْتُمْ فِیْهِ مِنْ شَیْءٍ فَحُكْمُهٗۤ اِلَی اللّٰهِ ؕ— ذٰلِكُمُ اللّٰهُ رَبِّیْ عَلَیْهِ تَوَكَّلْتُ ۖۗ— وَاِلَیْهِ اُنِیْبُ ۟

१०. आणि ज्या ज्या गोष्टीत तुमचा मतभेद असेल, त्याचा फैसला अल्लाहच्या हाती आहे.१ हाच अल्लाह माझा स्वामी व पालनकर्ता आहे, ज्यावर मी भरवसा ठेवला आहे आणि ज्याच्याकडे मी झुकतो. info

(१) या मतभेदाशी अभिप्रेत दीन (धर्म) चा मतभेद होय. उदा. ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम वगैरेत आपसात मतभेद आहेत. प्रत्येक धर्माचा मनुष्य हा दावा करतो की त्याचाच धर्म खरा आहे, वस्तुतः सर्व धर्म एकाच वेळी खरे असू शकत नाहीत. सत्य धर्म तर एकच आहे आणि एकच असू शकतो जगात सत्य धर्म आणि सत्य मार्ग ओळखण्याकरिता अल्लाहचा ग्रंथ ‘कुरआन’ अस्तित्वात आहे, परंतु जगातील लोक या ईशवाणीला आपला फैसला करणारा व शासक मानण्यास तयार नाही. शेवटी मग कयामतचाच दिवस बाकी राहतो, ज्या दिवशी अल्लाह या मतभेदाचा फैसला करील आणि सत्यवादी लोकांना जन्नतमध्ये आणि इतरांना जहन्नममध्ये आणि इतरांना जहन्नममध्ये दाखल करील.

التفاسير: