قۇرئان كەرىم مەنىلىرىنىڭ تەرجىمىسى - مارتىنچە تەرجىمىسى - مۇھەممەد شەپىيئ ئەنسارى

بەت نومۇرى:close

external-link copy
57 : 39

اَوْ تَقُوْلَ لَوْ اَنَّ اللّٰهَ هَدٰىنِیْ لَكُنْتُ مِنَ الْمُتَّقِیْنَ ۟ۙ

५७. किंवा म्हणावे की जर अल्लाहने मला मार्ग दाखविला असता तर मी देखील अल्लाहचे भय राखणाऱ्यांपैकी राहिलो असतो. info
التفاسير:

external-link copy
58 : 39

اَوْ تَقُوْلَ حِیْنَ تَرَی الْعَذَابَ لَوْ اَنَّ لِیْ كَرَّةً فَاَكُوْنَ مِنَ الْمُحْسِنِیْنَ ۟

५८. किंवा शिक्षा यातनांना पाहून म्हणू लागावे, कशाही प्रकारे माझे परत जाणे झाले असते तर मी देखील नेक सदाचारी लोकांपैकी राहिलो असतो. info
التفاسير:

external-link copy
59 : 39

بَلٰی قَدْ جَآءَتْكَ اٰیٰتِیْ فَكَذَّبْتَ بِهَا وَاسْتَكْبَرْتَ وَكُنْتَ مِنَ الْكٰفِرِیْنَ ۟

५९. का नाही? निश्चितच तुमच्याजवळ माझ्या आयती पोहचल्या होत्या ज्यांना तू खोटे ठरविले आणि घमेंड (व गर्व) केला आणि तू काफिर (सत्यविरोधक) लोकांपैकीच होतास. info
التفاسير:

external-link copy
60 : 39

وَیَوْمَ الْقِیٰمَةِ تَرَی الَّذِیْنَ كَذَبُوْا عَلَی اللّٰهِ وُجُوْهُهُمْ مُّسْوَدَّةٌ ؕ— اَلَیْسَ فِیْ جَهَنَّمَ مَثْوًی لِّلْمُتَكَبِّرِیْنَ ۟

६०. आणि ज्या लोकांनी अल्लाहविषयी असत्य रचले आहे, तर तुम्ही पाहाल की कयामतच्या दिवशी त्यांचे चेहरे काळे झाले असतील. काय घमेंड करणाऱ्यांचे ठिकाण जहन्नममध्ये नाही? info
التفاسير:

external-link copy
61 : 39

وَیُنَجِّی اللّٰهُ الَّذِیْنَ اتَّقَوْا بِمَفَازَتِهِمْ ؗ— لَا یَمَسُّهُمُ السُّوْٓءُ وَلَا هُمْ یَحْزَنُوْنَ ۟

६१. आणि ज्या लोकांनी अल्लाहचे भय (तकवा) बाळगले, त्यांना अल्लाह त्यांच्या सफलतेसह वाचविल, त्यांना एखादे दुःख स्पर्शही करू शकणार नाही आणि ना ते कशाही प्रकारे दुःखी होतील. info
التفاسير:

external-link copy
62 : 39

اَللّٰهُ خَالِقُ كُلِّ شَیْءٍ ؗ— وَّهُوَ عَلٰی كُلِّ شَیْءٍ وَّكِیْلٌ ۟

६२. अल्लाह समस्त वस्तूंचा निर्माणकर्ता आहे, आणि तोच प्रत्येक वस्तूचा संरक्षक आहे. info
التفاسير:

external-link copy
63 : 39

لَهٗ مَقَالِیْدُ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ ؕ— وَالَّذِیْنَ كَفَرُوْا بِاٰیٰتِ اللّٰهِ اُولٰٓىِٕكَ هُمُ الْخٰسِرُوْنَ ۟۠

६३. आकाशांच्या आणि धरतीच्या चाव्यांचा मालक तोच आहेे ज्या ज्या लोकांनी अल्लाहच्या आयतींचा इन्कार केला आहे, तेच नुकसान भोगणारे आहेत. info
التفاسير:

external-link copy
64 : 39

قُلْ اَفَغَیْرَ اللّٰهِ تَاْمُرُوْٓنِّیْۤ اَعْبُدُ اَیُّهَا الْجٰهِلُوْنَ ۟

६४. (तुम्ही) सांगा की हे मूर्खांनो! काय तुम्ही मला, अल्लाहखेरीज इतरांची उपासना करण्यास सांगता? info
التفاسير:

external-link copy
65 : 39

وَلَقَدْ اُوْحِیَ اِلَیْكَ وَاِلَی الَّذِیْنَ مِنْ قَبْلِكَ ۚ— لَىِٕنْ اَشْرَكْتَ لَیَحْبَطَنَّ عَمَلُكَ وَلَتَكُوْنَنَّ مِنَ الْخٰسِرِیْنَ ۟

६५. आणि निःसंशय, तुमच्याकडेही आणि तुमच्यापूर्वीच्या (सर्व पैगंबरां) कडेही वहयी केली गेली आहे की जर तुम्ही शिर्क (अल्लाहखेरीज दुसऱ्यांची भक्ती उपासना) केल्यास, निश्चितच तुमचे सर्व कर्म वाया जाईल आणि खात्रीने तुम्ही नुकसान उचलणाऱ्यांपैकी व्हाल. info
التفاسير:

external-link copy
66 : 39

بَلِ اللّٰهَ فَاعْبُدْ وَكُنْ مِّنَ الشّٰكِرِیْنَ ۟

६६. किंबहुना तुम्ही अल्लाहचीच उपासना करा आणि कृतज्ञता व्यक्त करणाऱ्यांपैकी व्हा. info
التفاسير:

external-link copy
67 : 39

وَمَا قَدَرُوا اللّٰهَ حَقَّ قَدْرِهٖ ۖۗ— وَالْاَرْضُ جَمِیْعًا قَبْضَتُهٗ یَوْمَ الْقِیٰمَةِ وَالسَّمٰوٰتُ مَطْوِیّٰتٌ بِیَمِیْنِهٖ ؕ— سُبْحٰنَهٗ وَتَعٰلٰی عَمَّا یُشْرِكُوْنَ ۟

६७. आणि त्या लोकांनी, अल्लाहचा जसा सन्मान करायला पाहिजे होता तसा केला नाही. समस्त धरती, कयामतच्या दिवशी त्याच्या मुठीत असेल आणि संपूर्ण आकाश त्याच्या उजव्या हातात गुंडाळलेले असेल तो मोठा पवित्र आणि अति उच्च आहे, त्या प्रत्येक वस्तू (व गोष्टी) पासून जिला लोक त्याचा सहभागी ठरवितात. info
التفاسير: