قۇرئان كەرىم مەنىلىرىنىڭ تەرجىمىسى - مارتىنچە تەرجىمىسى - مۇھەممەد شەپىيئ ئەنسارى

بەت نومۇرى:close

external-link copy
55 : 36

اِنَّ اَصْحٰبَ الْجَنَّةِ الْیَوْمَ فِیْ شُغُلٍ فٰكِهُوْنَ ۟ۚ

५५. निःसंशय, जन्नतवाले लोक आजच्या दिवशी आपल्या (मनोरंजन) कार्यात व्यस्त आणि आनंदित आहेत. info
التفاسير:

external-link copy
56 : 36

هُمْ وَاَزْوَاجُهُمْ فِیْ ظِلٰلٍ عَلَی الْاَرَآىِٕكِ مُتَّكِـُٔوْنَ ۟ۚ

५६. ते आणि त्यांच्या पत्न्या सावलीत आसनांवर तक्के लावून बसले असतील. info
التفاسير:

external-link copy
57 : 36

لَهُمْ فِیْهَا فَاكِهَةٌ وَّلَهُمْ مَّا یَدَّعُوْنَ ۟ۚ

५७. त्यांच्याकरिता जन्नतमध्ये प्रत्येक प्रकारचे मेवे असतील, आणि इतरही, जे काही ते मागतील. info
التفاسير:

external-link copy
58 : 36

سَلٰمٌ ۫— قَوْلًا مِّنْ رَّبٍّ رَّحِیْمٍ ۟

५८. दया करणाऱ्या पालनकर्त्यातर्फे त्यांना ‘सलाम’ म्हटले जाईल. info
التفاسير:

external-link copy
59 : 36

وَامْتَازُوا الْیَوْمَ اَیُّهَا الْمُجْرِمُوْنَ ۟

५९. आणि हे अपराध्यांनो! आज तुम्ही वेगळे व्हा. info
التفاسير:

external-link copy
60 : 36

اَلَمْ اَعْهَدْ اِلَیْكُمْ یٰبَنِیْۤ اٰدَمَ اَنْ لَّا تَعْبُدُوا الشَّیْطٰنَ ۚ— اِنَّهٗ لَكُمْ عَدُوٌّ مُّبِیْنٌ ۟ۙ

६०. हे आदमची संतती! काय मी तुमच्याकडून वचन नव्हते घेतले की तुम्ही सैतानाची उपासना न करावी. तो तर तुमचा उघड शत्रू आहे. info
التفاسير:

external-link copy
61 : 36

وَّاَنِ اعْبُدُوْنِیْ ؔؕ— هٰذَا صِرَاطٌ مُّسْتَقِیْمٌ ۟

६१. आणि फक्त माझीच उपासना करावी. हाच सरळ मार्ग आहे. info
التفاسير:

external-link copy
62 : 36

وَلَقَدْ اَضَلَّ مِنْكُمْ جِبِلًّا كَثِیْرًا ؕ— اَفَلَمْ تَكُوْنُوْا تَعْقِلُوْنَ ۟

६२. आणि सैतानाने तर तुमच्यापैकी अधिकांश समूहांना मार्गभ्रष्ट केले आहे. काय तुम्ही अक्कल नाही बाळगत?१ info

(१) अर्थात तुम्हाला एवढी सुद्धा अक्कल नाही की सैतान तुमचा शत्रू आहे, त्याचे म्हणणे मान्य करालया नको आणि मी (अल्लाह) तुमचा स्वामी व पालनकर्ता आहे. मीच तुम्हाला रोजीरोटी देतो आणि मीच तुमचे रात्रंदिवस संरक्षण करतो, यास्तव तुम्ही माझा आदेश मानला पाहिजे. तुम्ही तर सैतानाचे शत्रुत्व आणि माझ्या उपासनेचा हक्क न जाणून निर्बुद्धता आणि मूर्खपणा दाखवित आहात.

التفاسير:

external-link copy
63 : 36

هٰذِهٖ جَهَنَّمُ الَّتِیْ كُنْتُمْ تُوْعَدُوْنَ ۟

६३. हीच ती जहन्नम आहे, जिचा वायदा तुम्हाला दिला जात होता. info
التفاسير:

external-link copy
64 : 36

اِصْلَوْهَا الْیَوْمَ بِمَا كُنْتُمْ تَكْفُرُوْنَ ۟

६४. आपल्या कुप्र (इन्कारा) चा मोबदला प्राप्त करण्याकरिता आज तिच्यात दाखल व्हा. info
التفاسير:

external-link copy
65 : 36

اَلْیَوْمَ نَخْتِمُ عَلٰۤی اَفْوَاهِهِمْ وَتُكَلِّمُنَاۤ اَیْدِیْهِمْ وَتَشْهَدُ اَرْجُلُهُمْ بِمَا كَانُوْا یَكْسِبُوْنَ ۟

६५. आम्ही आज त्यांच्या तोंडावर मोहर लावून देऊ आणि त्यांचे हात आमच्याशी बोलतील आणि त्यांचे पाय साक्ष देतील, त्यांच्या त्या कर्मांची, जे ते करीत होते. info
التفاسير:

external-link copy
66 : 36

وَلَوْ نَشَآءُ لَطَمَسْنَا عَلٰۤی اَعْیُنِهِمْ فَاسْتَبَقُوا الصِّرَاطَ فَاَنّٰی یُبْصِرُوْنَ ۟

६६. आणि आम्ही इच्छिले असते तर त्यांचे डोळे आंधळे करून टाकले असते, मग हे मार्गाकडे धावत गेले असते, मग त्यांना कशा प्रकारे दिसून आले असते? info
التفاسير:

external-link copy
67 : 36

وَلَوْ نَشَآءُ لَمَسَخْنٰهُمْ عَلٰی مَكَانَتِهِمْ فَمَا اسْتَطَاعُوْا مُضِیًّا وَّلَا یَرْجِعُوْنَ ۟۠

६७. आणि आम्ही इच्छिले असते तर त्यांच्या जागेवरच त्यांचे चेहरे बिघडवून (विकृत करून) टाकले असते. मग ना ते हिंडू फिरू शकले असते आणि ना परतू शकले असते. info
التفاسير:

external-link copy
68 : 36

وَمَنْ نُّعَمِّرْهُ نُنَكِّسْهُ فِی الْخَلْقِ ؕ— اَفَلَا یَعْقِلُوْنَ ۟

६८. आणि आम्ही ज्याला वृद्ध करतो, त्याला जन्माच्या वेळेच्या अवस्थेकडे दुसऱ्यांदा परतवितो, मग काय हे तरीही समजून घेत नाही? info
التفاسير:

external-link copy
69 : 36

وَمَا عَلَّمْنٰهُ الشِّعْرَ وَمَا یَنْۢبَغِیْ لَهٗ ؕ— اِنْ هُوَ اِلَّا ذِكْرٌ وَّقُرْاٰنٌ مُّبِیْنٌ ۟ۙ

६९. आणि ना तर आम्ही या पैगंबरास काव्य (कविता) शिकविले, आणि ना हा त्यास योग्य आहे. हा तर केवळ बोध उपदेश आणि स्पष्ट कुरआन आहे. info
التفاسير:

external-link copy
70 : 36

لِّیُنْذِرَ مَنْ كَانَ حَیًّا وَّیَحِقَّ الْقَوْلُ عَلَی الْكٰفِرِیْنَ ۟

७०. यासाठी की त्याने प्रत्येक माणसाला सावध करावे, जो जिवंत आहे आणि सत्य (प्रमाण) प्रस्थापित व्हावे. info
التفاسير: