(१) यास अभिप्रेत केवढे आयुष्य आहे? भाष्यकारांनी वेगवेगळी आयुष्ये सांगितली आहेत. काहींनी काही हदीस वाचकांचा पुरावा देत म्हटले आहे की ६० वर्षांचे आयुष्य अभिप्रेत आहे. (इब्ने कसीर) परंतु आमच्या मते आयुष्य निश्चित करणे उचित नाही, कारण आयुष्य निश्चित करणे उचित नाही, कारण आयुष्य अनेक प्रकारचे असते. कोणी तरुण वयात कोणी प्रैाझ वयात तर कोणी वृद्धावस्थेत मरण पावतो. मग हा काळही गेलेल्या क्षणासारखा कमी होत नाही, किंबहुना प्रत्येक अवधी विशेषतः दीर्घ असतो. उदा. तारुण्याचा काळ वयस्क होण्यापासून पौढहोईपर्यंत आणि पौढहोण्याचा काळ वृद्ध होईपर्यंत आणि वृद्धावस्थेचा काळ मृत्युपावेत असतो. कोणालाही विचार चिंतनासाठी, बोध प्राप्तीसाठी आणि प्रभावित होण्यासाठी काही वर्षे, एखाद्याला त्याहून जास्त तर कोणाला त्याहूनही अधिक समय लाभतो आणि सर्वांना हा प्रश्न विचारणे योग्य ठरेल की आम्ही तुला एवढे आयुष्य दिले मग तू सत्य समजून घेण्याचा आणि ते प्राप्त करण्याचा प्रयत्न का केला नाहीस? (२) यास अभिप्रेत अंतिम पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम होत.