قۇرئان كەرىم مەنىلىرىنىڭ تەرجىمىسى - مارتىنچە تەرجىمىسى - مۇھەممەد شەپىيئ ئەنسارى

external-link copy
34 : 31

اِنَّ اللّٰهَ عِنْدَهٗ عِلْمُ السَّاعَةِ ۚ— وَیُنَزِّلُ الْغَیْثَ ۚ— وَیَعْلَمُ مَا فِی الْاَرْحَامِ ؕ— وَمَا تَدْرِیْ نَفْسٌ مَّاذَا تَكْسِبُ غَدًا ؕ— وَمَا تَدْرِیْ نَفْسٌ بِاَیِّ اَرْضٍ تَمُوْتُ ؕ— اِنَّ اللّٰهَ عَلِیْمٌ خَبِیْرٌ ۟۠

३४. निःसंशय, अल्लाहच्याच जवळ कयामतचे ज्ञान आहे. तोच पर्जन्यवृष्टी करतो, आणि मातेच्या गर्भात जे काही आहे ते जाणतो. कोणीही जाणत नाही की उद्या काय कमवील? ना कोणाला हे माहीत आहे की तो कोणत्या भूमीवर मरण पावेल.१ लक्षात ठेवा, अल्लाहच संपूर्ण ज्ञान बाळगणारा आणि सत्य जाणणारा आहे. info

(१) हदीसमधील उल्लेखानुसार पाच गोष्टी अपरोक्षा (गैब) च्या चाव्या आहेत. ज्यांना अल्लाहखेरीज कोणी जाणत नाही (सहीह बुखारी, तफसीर सूरह लुकमान आणि किताबुल इस्तिस्का) १) कयामत जवळ असल्याची निशाणी तर पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सांगितली आहे. परंतु कयामत येण्याचे निश्चित ज्ञान, अल्लाहशिवाय कोणालाही नाही, ना फरिश्त्याला, ना एखाद्या पैगंबराला. २) पावसाची बाबही अशीच आहे. निशाणी व संकेताद्वारे अनुमान तर लावले जाऊ शकते, परंतु ही गोष्ट प्रत्येकाच्या अनुभवात व अवलोकनात आहे की हे अनमान कधी खरे ठरते तर कधी चुकीचे. येथपावेतो की हवामान खात्याची घोषणाही खरी ठरत नाही. तात्पर्य पावसाचेही निश्चित ज्ञान अल्लाहखेरीज कोणालाही नाही. ३) मातेच्या गर्भात, यंत्राद्वारे लिंग परीक्षणाचे अर्धवट अनुमान बहुधा शक्य आहे, परंतु गर्भातले बाळ भाग्यशाली आहे की कमनशिबी आहे, पूर्ण आहे की अपूर्ण सुंदर आहे की कुरुप, काळे आहे की गोरे इ. गोष्टींचेही ज्ञान फक्त अल्लाहला आहे. ४) मनुष्य उद्या काय करील? ते धार्मिक कार्य असेल की ऐहिक? कोणालाही उद्याविषयीचे ज्ञान नाही की उद्याचा दिवस त्याच्या आयुष्यात उजाडेल किंवा नाही? आणि आलाच तर तो उद्या काय काम करील? ५) मृत्यु कोठे होईल घरात की घराबाहेर, आपल्या देशात की परदेशात, तारुम्यात मृत्यु येईल की म्हातारपणी, आपली मनोकांक्षा पूर्ण झाल्यानंतर की त्यापूर्वीच? कोणाला कसलेही ज्ञान नाही.

التفاسير: