قۇرئان كەرىم مەنىلىرىنىڭ تەرجىمىسى - مارتىنچە تەرجىمىسى - مۇھەممەد شەپىيئ ئەنسارى

external-link copy
44 : 3

ذٰلِكَ مِنْ اَنْۢبَآءِ الْغَیْبِ نُوْحِیْهِ اِلَیْكَ ؕ— وَمَا كُنْتَ لَدَیْهِمْ اِذْ یُلْقُوْنَ اَقْلَامَهُمْ اَیُّهُمْ یَكْفُلُ مَرْیَمَ ۪— وَمَا كُنْتَ لَدَیْهِمْ اِذْ یَخْتَصِمُوْنَ ۟

४४. या ग़ैब (अपरोक्ष) च्या बातम्या आहेत, ज्या आम्ही तुम्हाला वहयी करीत आहोत. तेव्हा तुम्ही त्या वेळी त्यांच्याजवळ नव्हते, जेव्हा ते आपले कलम (लेखणी) टाकू लागले होते की त्यांच्यापैकी मरियमचे पालनपोषण कोण करील? आणि ना तुम्ही त्यांच्या भांडणप्रसंगी त्यांच्याजवळ होते.१ info

(१) सध्याच्या काळात अहले बिदअत (इस्लाममध्ये नवी रुढी व श्रद्धा प्रचलित करणाऱ्या) लोकांनी पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या मान-मर्यादेत अतिशयोक्ती करताना, त्यांना अल्लाहसारखे भविष्य व अपरोक्ष ज्ञाता आणि सर्वव्यापी मानण्याची श्रद्धा मनाने रचली आहे. या आयतीत या दोन्ही गोष्टींचे खंडन होत आहे. जर पैगंबर (स.) यांना खरोखर अपरोक्ष ज्ञान असते तर अल्लाहने हे फर्माविले नसते की आम्ही या ग़ैबी बातम्या तुम्हाला पोहचवित आहोत.

التفاسير: