قۇرئان كەرىم مەنىلىرىنىڭ تەرجىمىسى - مارتىنچە تەرجىمىسى - مۇھەممەد شەپىيئ ئەنسارى

بەت نومۇرى:close

external-link copy
195 : 3

فَاسْتَجَابَ لَهُمْ رَبُّهُمْ اَنِّیْ لَاۤ اُضِیْعُ عَمَلَ عَامِلٍ مِّنْكُمْ مِّنْ ذَكَرٍ اَوْ اُ ۚ— بَعْضُكُمْ مِّنْ بَعْضٍ ۚ— فَالَّذِیْنَ هَاجَرُوْا وَاُخْرِجُوْا مِنْ دِیَارِهِمْ وَاُوْذُوْا فِیْ سَبِیْلِیْ وَقٰتَلُوْا وَقُتِلُوْا لَاُكَفِّرَنَّ عَنْهُمْ سَیِّاٰتِهِمْ وَلَاُدْخِلَنَّهُمْ جَنّٰتٍ تَجْرِیْ مِنْ تَحْتِهَا الْاَنْهٰرُ ۚ— ثَوَابًا مِّنْ عِنْدِ اللّٰهِ ؕ— وَاللّٰهُ عِنْدَهٗ حُسْنُ الثَّوَابِ ۟

१९५. यास्तव त्यांच्या पालनकर्त्याने त्यांची दुआ (प्रार्थना) कबूल केली (आणि फर्माविले) की तुमच्यापैकी कोणा कर्म करणाऱ्याच्या कर्माला, मग तो पुरुष असो की स्त्री, मी वाया जाऊ देत नाही. तुम्ही आपसात एकमेकांचे सहायक आहात, यास्तव ते लोक ज्यांनी (धर्मासाठी) स्थलांतर केले आणि ज्यांना आपल्या घरातून बाहेर घालविले गेले आणि ज्यांना माझ्या मार्गात कष्ट-यातना दिली गेली आणि ज्यांनी जिहाद केले आणि शहीद केले गेले, मी अवश्य त्यांची दुष्कर्मे त्यांच्यापासून दूर करीन आणि अवश्य त्यांना त्या जन्नतमध्ये नेईन, ज्यांच्या खाली प्रवाह वाहत आहेत. हा मोबदला आहे अल्लाहतर्फे आणि अल्लाहजवळच चांगला मोबदला आहे. info
التفاسير:

external-link copy
196 : 3

لَا یَغُرَّنَّكَ تَقَلُّبُ الَّذِیْنَ كَفَرُوْا فِی الْبِلَادِ ۟ؕ

१९६. शहरांमध्ये काफिरांचे (इन्कारी लोकांचे) येणे-जाणे तुम्हाला धोक्यात न टाकावे. info
التفاسير:

external-link copy
197 : 3

مَتَاعٌ قَلِیْلٌ ۫— ثُمَّ مَاْوٰىهُمْ جَهَنَّمُ ؕ— وَبِئْسَ الْمِهَادُ ۟

१९७. हा तर फार अल्पसा फायदा आहे. त्यानंतर त्यांचे ठिकाण जहन्नम आहे, आणि ते फार वाईट ठिकाण आहे. info
التفاسير:

external-link copy
198 : 3

لٰكِنِ الَّذِیْنَ اتَّقَوْا رَبَّهُمْ لَهُمْ جَنّٰتٌ تَجْرِیْ مِنْ تَحْتِهَا الْاَنْهٰرُ خٰلِدِیْنَ فِیْهَا نُزُلًا مِّنْ عِنْدِ اللّٰهِ ؕ— وَمَا عِنْدَ اللّٰهِ خَیْرٌ لِّلْاَبْرَارِ ۟

१९८. परंतु जे लोक आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगत राहिले, त्यांच्यासाठी जन्नत आहे ज्यांच्या खाली प्रवाह वाहत आहेत, त्यात ते नेहमी नेहमी राहतील हे अल्लाहतर्फे अतिथ्य (पाहुणचार) आहे आणि पुण्य-कार्य करणाऱ्यांकरिता अल्लाहजवळ जे काही आहे ते सर्वाधिक चांगले आणि उत्तम आहे. info
التفاسير:

external-link copy
199 : 3

وَاِنَّ مِنْ اَهْلِ الْكِتٰبِ لَمَنْ یُّؤْمِنُ بِاللّٰهِ وَمَاۤ اُنْزِلَ اِلَیْكُمْ وَمَاۤ اُنْزِلَ اِلَیْهِمْ خٰشِعِیْنَ لِلّٰهِ ۙ— لَا یَشْتَرُوْنَ بِاٰیٰتِ اللّٰهِ ثَمَنًا قَلِیْلًا ؕ— اُولٰٓىِٕكَ لَهُمْ اَجْرُهُمْ عِنْدَ رَبِّهِمْ ؕ— اِنَّ اللّٰهَ سَرِیْعُ الْحِسَابِ ۟

१९९. आणि ग्रंथधारकांपैकी काही लोक अवश्य असे आहेत जे अल्लाहवर ईमान राखतात आणि जे तुमच्यावर उतरविले गेले आहे आणि जे त्यांच्याकडे उतरविले गेले आहे त्यावर ईमान राखतात. अल्लाहचे भय बाळगून राहतात, आणि अल्लाहच्या आयतींना थोडे थोडे मोल घेऊन विकत नाहीत१ त्यांचा मोबदला त्यांच्या पालनकर्त्याजवळ आहे. निःसंशय अल्लाह लवकरच हिशोब घेणार आहे. info

(१) या आयतीत ग्रंथधारकांच्या त्या समूहाबाबत उल्लेख आहे, ज्यांना पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या प्रेषित्वावर ईमान राखण्याचे सद्‌भाग्य प्राप्त झाले. त्यांचे ईमान आणि ईमानाच्या गुणविशेषांचे वर्णन करून सर्वश्रेष्ठ अल्लाहने इतर ग्रंथधारकांपेक्षा त्यांना उत्तम ठरविले.

التفاسير:

external-link copy
200 : 3

یٰۤاَیُّهَا الَّذِیْنَ اٰمَنُوا اصْبِرُوْا وَصَابِرُوْا وَرَابِطُوْا ۫— وَاتَّقُوا اللّٰهَ لَعَلَّكُمْ تُفْلِحُوْنَ ۟۠

२००. हे ईमानधारकांनो! तुम्ही धीर-संयम राखा आणि एकमेकांना मजबुती देत राहा आणि जिहाद (धर्मयुद्ध) साठी तयार राहा, यासाठी की तुम्ही सफलता प्राप्त करावी. info
التفاسير: