قۇرئان كەرىم مەنىلىرىنىڭ تەرجىمىسى - مارتىنچە تەرجىمىسى - مۇھەممەد شەپىيئ ئەنسارى

بەت نومۇرى:close

external-link copy
24 : 29

فَمَا كَانَ جَوَابَ قَوْمِهٖۤ اِلَّاۤ اَنْ قَالُوا اقْتُلُوْهُ اَوْ حَرِّقُوْهُ فَاَنْجٰىهُ اللّٰهُ مِنَ النَّارِ ؕ— اِنَّ فِیْ ذٰلِكَ لَاٰیٰتٍ لِّقَوْمٍ یُّؤْمِنُوْنَ ۟

२४. त्याच्या जनसमूहाचे उत्तर याखेरीज दुसरे काही नव्हते की ते म्हणाले, याला मारून टाका किंवा याला जाळून टाका. शेवटी अल्लाहने त्यांना आगीपासून वाचविले. यात ईमान राखणाऱ्यांकरिता अनेक निशाण्या आहेत. info
التفاسير:

external-link copy
25 : 29

وَقَالَ اِنَّمَا اتَّخَذْتُمْ مِّنْ دُوْنِ اللّٰهِ اَوْثَانًا ۙ— مَّوَدَّةَ بَیْنِكُمْ فِی الْحَیٰوةِ الدُّنْیَا ۚ— ثُمَّ یَوْمَ الْقِیٰمَةِ یَكْفُرُ بَعْضُكُمْ بِبَعْضٍ وَّیَلْعَنُ بَعْضُكُمْ بَعْضًا ؗ— وَّمَاْوٰىكُمُ النَّارُ وَمَا لَكُمْ مِّنْ نّٰصِرِیْنَ ۟ۗۖ

२५. (हजरत इब्राहीम अलै.) म्हणाले की तुम्ही अल्लाहऐवजी ज्या मूर्ती (दैवतां) ची पूजा अर्चना केली आहे त्यांना तुम्ही आपल्या ऐहिक मैत्रीचे कारण बनविले आहे. तुम्ही सर्व कयामतच्या दिवशी एकमेकांचा इन्कार करू लागाल आणि एकमेकांना धिःक्कारू लागाल आणि तुम्हा सर्रांचे ठिकाण जहन्नमध्ये असेल, आणि कोणी तुमची मदत करणाराही नसेल. info
التفاسير:

external-link copy
26 : 29

فَاٰمَنَ لَهٗ لُوْطٌ ۘ— وَقَالَ اِنِّیْ مُهَاجِرٌ اِلٰی رَبِّیْ ؕ— اِنَّهٗ هُوَ الْعَزِیْزُ الْحَكِیْمُ ۟

२६. तेव्हा त्याच्या (हजरत इब्राहीम अलै.) वर (हजरत) लूत (अलै.) यांनी ईमान राखले आणि म्हणाले, मी आपल्या पालनकर्त्याकडे हिजरत (स्थलांतर) करणारा आहे. तो मोठा वर्चस्वशाली आणि हिकमत (बुद्धी-कौशल्य) बाळगणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
27 : 29

وَوَهَبْنَا لَهٗۤ اِسْحٰقَ وَیَعْقُوْبَ وَجَعَلْنَا فِیْ ذُرِّیَّتِهِ النُّبُوَّةَ وَالْكِتٰبَ وَاٰتَیْنٰهُ اَجْرَهٗ فِی الدُّنْیَا ۚ— وَاِنَّهٗ فِی الْاٰخِرَةِ لَمِنَ الصّٰلِحِیْنَ ۟

२७. आणि आम्ही त्याला (इब्राहीम अलै. यांना) इसहाक आणि याकूब प्रदान केले, आणि आम्ही प्रेषित्व आणि ग्रंथ त्यांच्या वंशात राखला, आणि आम्ही या जगातही त्यांना चांगला मोबदला दिला आणि आखिरतमध्ये तर ते सदाचारी लोकांपैकी आहेत. info
التفاسير:

external-link copy
28 : 29

وَلُوْطًا اِذْ قَالَ لِقَوْمِهٖۤ اِنَّكُمْ لَتَاْتُوْنَ الْفَاحِشَةَ ؗ— مَا سَبَقَكُمْ بِهَا مِنْ اَحَدٍ مِّنَ الْعٰلَمِیْنَ ۟

२८. आणि (हजरत) लूत (अलै.) यांचाही (उल्लेख करा) जेव्हा ते आपल्या जनसमूहाला म्हणाले की तुम्ही तर असे निर्लज्जपणाचे काम करता जे तुमच्यापूर्वी संपूर्ण जगापैकी कोणीही केले नाही. info
التفاسير:

external-link copy
29 : 29

اَىِٕنَّكُمْ لَتَاْتُوْنَ الرِّجَالَ وَتَقْطَعُوْنَ السَّبِیْلَ ۙ۬— وَتَاْتُوْنَ فِیْ نَادِیْكُمُ الْمُنْكَرَ ؕ— فَمَا كَانَ جَوَابَ قَوْمِهٖۤ اِلَّاۤ اَنْ قَالُوا ائْتِنَا بِعَذَابِ اللّٰهِ اِنْ كُنْتَ مِنَ الصّٰدِقِیْنَ ۟

२९. काय तुम्ही (कामवासना पूर्तीकरिता) पुरुषांजवळ येता, आणि वाटमार करतात आणि आपल्या आम सभामध्ये निर्लज्जतेचे काम करता? तेव्हा त्याच्या उत्तरादाखल त्यांच्या जनसमूहाने याखेरीज दुसरे काही सांगितले नाही की पुरे कर, जर सच्चा आहेस तर आमच्यावर अल्लाहचा अज़ाब (शिक्षा) आणून दाखव. info
التفاسير:

external-link copy
30 : 29

قَالَ رَبِّ انْصُرْنِیْ عَلَی الْقَوْمِ الْمُفْسِدِیْنَ ۟۠

३०. (हजरत) लूत (अलै.) यांनी दुआ (प्रार्थना) केली की, हे माझ्या पालनकर्त्या! या दुराचारी लोकांच्या विरोधात माझी मदत कर. info
التفاسير: