قۇرئان كەرىم مەنىلىرىنىڭ تەرجىمىسى - مارتىنچە تەرجىمىسى - مۇھەممەد شەپىيئ ئەنسارى

بەت نومۇرى:close

external-link copy
44 : 25

اَمْ تَحْسَبُ اَنَّ اَكْثَرَهُمْ یَسْمَعُوْنَ اَوْ یَعْقِلُوْنَ ؕ— اِنْ هُمْ اِلَّا كَالْاَنْعَامِ بَلْ هُمْ اَضَلُّ سَبِیْلًا ۟۠

४४. काय तुम्ही याच विचारात आहात की त्यांच्यापैकी बहुतेक जण ऐकतात किंवा समजतात. ते तर अगदी जनावरांसारखे आहेत, किंबहुना त्यांच्यापेक्षाही अधिक वाट चुकलेले. info
التفاسير:

external-link copy
45 : 25

اَلَمْ تَرَ اِلٰی رَبِّكَ كَیْفَ مَدَّ الظِّلَّ ۚ— وَلَوْ شَآءَ لَجَعَلَهٗ سَاكِنًا ۚ— ثُمَّ جَعَلْنَا الشَّمْسَ عَلَیْهِ دَلِیْلًا ۟ۙ

४५. काय तुम्ही नाही पाहिले की तुमच्या पालनकर्त्याने सावलीला कशा प्रकारे विस्तृत केले आहे. त्याने इच्छिले असते तर तिला स्थिर केले असते, मग सूर्याला आम्ही त्यावर प्रमाण ठरविले. info
التفاسير:

external-link copy
46 : 25

ثُمَّ قَبَضْنٰهُ اِلَیْنَا قَبْضًا یَّسِیْرًا ۟

४६. मग आम्ही त्याला हळू हळू आपल्याकडे ओढून घेतले. info
التفاسير:

external-link copy
47 : 25

وَهُوَ الَّذِیْ جَعَلَ لَكُمُ الَّیْلَ لِبَاسًا وَّالنَّوْمَ سُبَاتًا وَّجَعَلَ النَّهَارَ نُشُوْرًا ۟

४७. आणि तोच आहे, ज्याने रात्रीला तुमच्यासाठी पोषाख बनविले, आणि झोपेला सुख शांतीमय बनविले आणि दिवसाला उठून उभे राहण्याची वेळ. info
التفاسير:

external-link copy
48 : 25

وَهُوَ الَّذِیْۤ اَرْسَلَ الرِّیٰحَ بُشْرًاۢ بَیْنَ یَدَیْ رَحْمَتِهٖ ۚ— وَاَنْزَلْنَا مِنَ السَّمَآءِ مَآءً طَهُوْرًا ۟ۙ

४८. आणि तोच आहे जो कृपास्वरूप पावसापूर्वी खूशखबर देणाऱ्या हवेला पाठवितो आणि आम्ही आकाशातून अतिशय स्वच्छ- शुद्ध (पाक) पाणी वर्षवितो. info
التفاسير:

external-link copy
49 : 25

لِّنُحْیِ بِهٖ بَلْدَةً مَّیْتًا وَّنُسْقِیَهٗ مِمَّا خَلَقْنَاۤ اَنْعَامًا وَّاَنَاسِیَّ كَثِیْرًا ۟

४९. यासाठी की त्याच्याद्वारे मृत झालेल्या शहराला जिवंत करावे आणि ते आम्ही आपल्या निर्मितीपैकी अधिकांश जनावरांना आणि माणसांना पाजतो. info
التفاسير:

external-link copy
50 : 25

وَلَقَدْ صَرَّفْنٰهُ بَیْنَهُمْ لِیَذَّكَّرُوْا ۖؗ— فَاَبٰۤی اَكْثَرُ النَّاسِ اِلَّا كُفُوْرًا ۟

५०. आणि निःसंशय, आम्ही यास त्यांच्या दरम्यान अनेक प्रकारे वर्णन केले यासाठी की त्यांनी बोध प्राप्त करावा, परंतु तरीही अधिकांश लोकांनी कृतघ्नतेखेरीज (आणखी काही) मानले नाही. info
التفاسير:

external-link copy
51 : 25

وَلَوْ شِئْنَا لَبَعَثْنَا فِیْ كُلِّ قَرْیَةٍ نَّذِیْرًا ۟ؗۖ

५१. आणि आम्ही जर इच्छिले असते तर प्रत्येक वस्तीत एक भय दाखविणारा पाठविला असता. info
التفاسير:

external-link copy
52 : 25

فَلَا تُطِعِ الْكٰفِرِیْنَ وَجَاهِدْهُمْ بِهٖ جِهَادًا كَبِیْرًا ۟

५२. तेव्हा तुम्ही काफिरांचे म्हणणे मान्य करू नका आणि कुरआनद्वारे पूर्ण शक्तीने त्यांच्याशी महाधर्मयुद्ध (जिहाद) करा. info
التفاسير:

external-link copy
53 : 25

وَهُوَ الَّذِیْ مَرَجَ الْبَحْرَیْنِ هٰذَا عَذْبٌ فُرَاتٌ وَّهٰذَا مِلْحٌ اُجَاجٌ ۚ— وَجَعَلَ بَیْنَهُمَا بَرْزَخًا وَّحِجْرًا مَّحْجُوْرًا ۟

५३. आणि तोच आहे ज्याने दोन समुद्रांना आपसात मिळवून ठेवले आहे. एक आहे गोड चवदार आणि दुसरा खारा कडू आणि आणि या दोघांच्या दरम्यान एक आड पडदा आणि भक्कम आड उभा केला. info
التفاسير:

external-link copy
54 : 25

وَهُوَ الَّذِیْ خَلَقَ مِنَ الْمَآءِ بَشَرًا فَجَعَلَهٗ نَسَبًا وَّصِهْرًا ؕ— وَكَانَ رَبُّكَ قَدِیْرًا ۟

५४. आणि तोच आहे ज्याने पाण्यापासून मानवाला निर्माण केले, मग त्याला वंश बाळगणारा आणि सासरवाडीचे नातेसंबंध राखणारा बनविले. निःसंशय, तुमचा पालनकर्ता प्रत्येक गोष्ट करण्यास समर्थ आहे. info
التفاسير:

external-link copy
55 : 25

وَیَعْبُدُوْنَ مِنْ دُوْنِ اللّٰهِ مَا لَا یَنْفَعُهُمْ وَلَا یَضُرُّهُمْ ؕ— وَكَانَ الْكَافِرُ عَلٰی رَبِّهٖ ظَهِیْرًا ۟

५५. आणि हे अल्लाहऐवजी अशांची उपासना करतात जे ना त्यांना काही लाभ पोहचवू शकतात आणि ना काही हानि पोहचवू शकतात. काफिर तर आहेच आपल्या पालनकर्त्याविरूद्ध (सैताना) चा सहाय्यक. info
التفاسير: