قۇرئان كەرىم مەنىلىرىنىڭ تەرجىمىسى - مارتىنچە تەرجىمىسى - مۇھەممەد شەپىيئ ئەنسارى

external-link copy
41 : 24

اَلَمْ تَرَ اَنَّ اللّٰهَ یُسَبِّحُ لَهٗ مَنْ فِی السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ وَالطَّیْرُ صٰٓفّٰتٍ ؕ— كُلٌّ قَدْ عَلِمَ صَلَاتَهٗ وَتَسْبِیْحَهٗ ؕ— وَاللّٰهُ عَلِیْمٌۢ بِمَا یَفْعَلُوْنَ ۟

४१. काय तुम्ही नाही पाहिले की आकाश आणि धरतीची समस्त ईशनिर्मिती आणि पंख पसरून उडणारे सर्व पक्षी अल्लाहीच तस्बीह (नामस्मरण )(गुणगान) करण्यात मग्न आहेत. प्रत्येकाची नमाज आणि तस्बीह (नामस्मरण) त्याला माहीत आहे आणि लोक जे काही करतात, अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो.१ info

(१) अर्थात आकाश व जमिनीवर निवास करणारे, ज्या प्रकारे अल्लाहचे आज्ञापालन आणि प्रशंसा करतात, ते सर्व तो जाणतो. ही समस्त मानव आणि जिन्नांना चेतावणी आहे की अल्लाहने तुम्हाला बुद्धी आणि विवेकाचे स्वातंत्र्य दिले आहे, तेव्हा तुम्ही इतर निर्मितीच्या तुलनेत अधिक ईश-स्तुती व महिमागान केले पाहिजे. परंतु वस्तुस्थिती याच्या उलट आहे. अल्लाहची इतर निर्मिती तर अल्लाहचे गुणगान करण्यात मग्न आहे परंतु बुद्धी आणि प्रज्ञेने सुशोभित असलेली ही ईशनिर्मिती याबाबत सुस्त आहे ज्याबद्दल खात्रीने अल्लाहच्या पकडीस पात्र ठरतील.

التفاسير: