قۇرئان كەرىم مەنىلىرىنىڭ تەرجىمىسى - مارتىنچە تەرجىمىسى - مۇھەممەد شەپىيئ ئەنسارى

external-link copy
252 : 2

تِلْكَ اٰیٰتُ اللّٰهِ نَتْلُوْهَا عَلَیْكَ بِالْحَقِّ ؕ— وَاِنَّكَ لَمِنَ الْمُرْسَلِیْنَ ۟

२५२. या अल्लाहच्या आयती आहेत, ज्या आम्ही तुम्हाला सत्याच्या आधारे वाचवून ऐकवित आहोत आणि निश्चितच तुम्ही पैगंबरांपैकी आहात.१ info

(१) या भूतकालीन घटना, ज्यांचे ज्ञान, पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर अवतरित पवित्र कुरआनाच्या माध्यमाने साऱ्या जगाला होत आहे. हे मुहम्मद (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) निःसंशय, तुमच्या प्रेषित्वाचा आणि सत्यतेचा पुरावआ आहे, या घटनांचे वर्णन ना एखाद्या ग्रंथात केले गेले आहे, ना कर्णापकर्णा ऐकिवात आहे, ज्यावरून हे सिद्ध होते की या अपरोक्षाच्या (गैबच्या) खबरी आहेत, ज्या वहयी अर्थात ईशवाणीद्वारे, अल्लाह पैगंबरावर उतरवित आहे.

التفاسير: