قۇرئان كەرىم مەنىلىرىنىڭ تەرجىمىسى - مارتىنچە تەرجىمىسى - مۇھەممەد شەپىيئ ئەنسارى

external-link copy
102 : 2

وَاتَّبَعُوْا مَا تَتْلُوا الشَّیٰطِیْنُ عَلٰی مُلْكِ سُلَیْمٰنَ ۚ— وَمَا كَفَرَ سُلَیْمٰنُ وَلٰكِنَّ الشَّیٰطِیْنَ كَفَرُوْا یُعَلِّمُوْنَ النَّاسَ السِّحْرَ ۗ— وَمَاۤ اُنْزِلَ عَلَی الْمَلَكَیْنِ بِبَابِلَ هَارُوْتَ وَمَارُوْتَ ؕ— وَمَا یُعَلِّمٰنِ مِنْ اَحَدٍ حَتّٰی یَقُوْلَاۤ اِنَّمَا نَحْنُ فِتْنَةٌ فَلَا تَكْفُرْ ؕ— فَیَتَعَلَّمُوْنَ مِنْهُمَا مَا یُفَرِّقُوْنَ بِهٖ بَیْنَ الْمَرْءِ وَزَوْجِهٖ ؕ— وَمَا هُمْ بِضَآرِّیْنَ بِهٖ مِنْ اَحَدٍ اِلَّا بِاِذْنِ اللّٰهِ ؕ— وَیَتَعَلَّمُوْنَ مَا یَضُرُّهُمْ وَلَا یَنْفَعُهُمْ ؕ— وَلَقَدْ عَلِمُوْا لَمَنِ اشْتَرٰىهُ مَا لَهٗ فِی الْاٰخِرَةِ مِنْ خَلَاقٍ ۫ؕ— وَلَبِئْسَ مَا شَرَوْا بِهٖۤ اَنْفُسَهُمْ ؕ— لَوْ كَانُوْا یَعْلَمُوْنَ ۟

१०२. आणि अशा गोष्टीच्या मागे लागले जिला सैतानी लोक, हजरत सुलेमानच्या साम्राज्यात पढत असत. सुलेमानने तर कुप्र (इन्कार) केला नव्हता. किंबहुना हे कुप्र-कर्म सैतानांचे होते. ते लोकांना जादू-टोणा शिकवित असत आणि बाबीलमध्ये हारुत व मारुत या दोन फरिश्त्यांवर जो उतरविला गेला होता, ते दोघेही कोणत्याही माणसाला त्या वेळपर्यंत शिकवित नसत, जोपर्यंत हे सांगत नसत की आम्ही तर एक कसोटी मात्र आहोत, तू कुप्र करू नकोस. मग लोक त्यांच्याकडून अशी विद्या शिकत की ज्याद्वारे पती-पत्नीच्या दरम्यान फूट पाडावी. वास्तविक अल्लाहच्या मर्जीविना ते कोणाला कसलेही नुकसान पोहचवू शकत नाही.१ हे लोक ते काही शिकतात, जे यांना न नुकसान पोहचवील आणि ना फायदा पोहचवू शकेल आणि ते खात्रीपूर्वक जाणतात की हे प्राप्त करणाऱ्याचा आखिरतमध्ये काहीच हिस्सा नाही आणि ती अतिशय वाईट गोष्ट आहे, जिच्या मोबदल्यात ते स्वतःला विकत आहेत. यांनी हे जाणले असते तर! info

(१) ही जादूदेखील त्या वेळे पर्यंत कोणाला नुकसान पोहचवू शकत नाही जोपर्यंत अल्लाहचा आदेश आणि मर्जी नसेल, यास्तव ती शिकण्याचा काय फायदा? याच कारणास्तव इस्लामने जादू शिकण्यास आणि करण्यास कुप्र (इन्कार) म्हटले आहे. प्रत्येक प्रकारची भलाईची कामना आणि नुकसानापासून बचाव करण्याकरिता केवळ अल्लाहशीच दुआ- प्रार्थना केली जावी, कारण तोच प्रत्येक गोष्ट करणारा आहे आणि प्राणीमात्राचे प्रत्येक काम त्याच्याच मर्जीने होते.

التفاسير: