قۇرئان كەرىم مەنىلىرىنىڭ تەرجىمىسى - مارتىنچە تەرجىمىسى - مۇھەممەد شەپىيئ ئەنسارى

external-link copy
13 : 18

نَحْنُ نَقُصُّ عَلَیْكَ نَبَاَهُمْ بِالْحَقِّ ؕ— اِنَّهُمْ فِتْیَةٌ اٰمَنُوْا بِرَبِّهِمْ وَزِدْنٰهُمْ هُدًی ۟ۗۖ

१३. आम्ही त्यांची खरी कहाणी तुमच्यासमोर वर्णन करीत आहोत, या काही तरुणांनी१ आपल्या पालनकर्त्यावर ईमान राखले आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनात प्रगती प्रदान केली. info

(१) काही धर्मज्ञानी लोकांच्या मते हे तरुण ख्रिश्चन धर्माचे अनुयायी होते, काहींच्या मते त्याचा काळ येशू ख्रिस्तापूर्वीचा होता. हाफीज इब्ने कसीर यांनी याच कथनाला प्राधान्य दिले. असे म्हणतात की एक राजा होता, जो लोकांना मूर्तीपूजा करण्याची व त्यांच्या नावाने भोग प्रसाद चढविण्याची शिकवण देत असे. अल्लाहने या काही तरुणांच्या मनात हा विचार आणला की उपासनायोग्य केवळ अल्लाहच आहे, जो आकाश व धरतीचा निर्माणकर्ता आहे, साऱ्या जगाचा पालनहार आहे. ‘फित्युतुन्‌’ अनेक वचन आहे, तेव्हा त्यांची संख्या नऊपेक्षा कमी नव्हती, हे वेगळे होऊन एका ठिकाणी एकमेव अल्लाहची उपासना करत. हळूहळू लोकांमध्ये त्यांच्या एकेश्वरवादावरील विश्वासाची चर्चा होऊ लागली. हे राजालाही कळाले तेव्हा त्याने, त्यांना दरबारात बोलावून विचारले. त्यांनी निर्भयपणे एकेश्वरवादाविषयी सांगितले. शेवटी राजा आणि आपल्या जमातीच्या मूर्तीपूजकांच्या भयाने आपल्या धर्म व ईमानाच्या रक्षणार्थ, वस्तीपासून दूर एका पर्वताच्या गुफेत लपले. जिथे अल्लाहने त्यांना गाढनिद्रेत झोपविले आणि ते सतत तीनशे वर्षांपर्यंत झोपत राहिले.

التفاسير: