قۇرئان كەرىم مەنىلىرىنىڭ تەرجىمىسى - مارتىنچە تەرجىمىسى - مۇھەممەد شەپىيئ ئەنسارى

نەھل

external-link copy
1 : 16

اَتٰۤی اَمْرُ اللّٰهِ فَلَا تَسْتَعْجِلُوْهُ ؕ— سُبْحٰنَهٗ وَتَعٰلٰی عَمَّا یُشْرِكُوْنَ ۟

१. सर्वश्रेष्ठ अल्लाहचा आदेश येऊन पोहोचला, आता याची घाई माजवू नका समस्त पवित्रता त्याच्यासाठी आहे, तो सर्वांत महान आहे, त्या सर्वांपेक्षा ज्यांना हे अल्लाहच्या जवळ भागीदार असल्याचे सांगतात. info
التفاسير:

external-link copy
2 : 16

یُنَزِّلُ الْمَلٰٓىِٕكَةَ بِالرُّوْحِ مِنْ اَمْرِهٖ عَلٰی مَنْ یَّشَآءُ مِنْ عِبَادِهٖۤ اَنْ اَنْذِرُوْۤا اَنَّهٗ لَاۤ اِلٰهَ اِلَّاۤ اَنَا فَاتَّقُوْنِ ۟

२. तोच फरिश्त्यांना आपली वहयी (प्रकाशना) देऊन आपल्या आदेशाद्वारे आपल्या दासांपैकी, ज्याच्यावर इच्छितो उतरवितो, यासाठी की, तुम्ही, लोकांना सचेत करावे की माझ्याशिवाय दुसरा कोणीही उपासनेस पात्र नाही, यास्तव तुम्ही माझे भय राखा. info
التفاسير:

external-link copy
3 : 16

خَلَقَ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضَ بِالْحَقِّ ؕ— تَعٰلٰی عَمَّا یُشْرِكُوْنَ ۟

३. त्यानेच आकाशांना आणि धरतीला सत्यासह निर्माण केले. तो तर त्याहून उच्चतम आहे जे अनेकेश्वरवादी करतात. info
التفاسير:

external-link copy
4 : 16

خَلَقَ الْاِنْسَانَ مِنْ نُّطْفَةٍ فَاِذَا هُوَ خَصِیْمٌ مُّبِیْنٌ ۟

४. त्याने मानवांना वीर्यापासून निर्माण केले, मग तो उघड भांडखोर बनला. info
التفاسير:

external-link copy
5 : 16

وَالْاَنْعَامَ خَلَقَهَا لَكُمْ فِیْهَا دِفْءٌ وَّمَنَافِعُ وَمِنْهَا تَاْكُلُوْنَ ۟

५. त्यानेच जनावरे निर्माण केलीत, ज्यात तुमच्यासाठी उष्णता देणारे कपडे आहेत. इतरही अनेक फायदे आहेत आणि काही तुमच्या खाण्यासाठी उपयोगी पडतात. info
التفاسير:

external-link copy
6 : 16

وَلَكُمْ فِیْهَا جَمَالٌ حِیْنَ تُرِیْحُوْنَ وَحِیْنَ تَسْرَحُوْنَ ۪۟

६. आणि त्यांच्यात तुमच्यासाठी शोभाही आहे जेव्हा त्यांना चारून आणाल तेव्हाही आणि जेव्हा चारण्यासाठी न्याल तेव्हाही. info
التفاسير: