قۇرئان كەرىم مەنىلىرىنىڭ تەرجىمىسى - مارتىنچە تەرجىمىسى - مۇھەممەد شەپىيئ ئەنسارى

بەت نومۇرى:close

external-link copy
87 : 12

یٰبَنِیَّ اذْهَبُوْا فَتَحَسَّسُوْا مِنْ یُّوْسُفَ وَاَخِیْهِ وَلَا تَایْـَٔسُوْا مِنْ رَّوْحِ اللّٰهِ ؕ— اِنَّهٗ لَا یَایْـَٔسُ مِنْ رَّوْحِ اللّٰهِ اِلَّا الْقَوْمُ الْكٰفِرُوْنَ ۟

८७. माझ्या प्रिय पुत्रांनो! तुम्ही जा आणि यूसुफ आणि त्याच्या भावाचा चांगल्या प्रकारे शोध घ्या आणि अल्लाहच्या दयेपासून निराश होऊ नका. निःसंशय, अल्लाहच्या दया-कृपेपासून तेच लोक निराश होतात जे काफिर (इन्कारी) असतात. info
التفاسير:

external-link copy
88 : 12

فَلَمَّا دَخَلُوْا عَلَیْهِ قَالُوْا یٰۤاَیُّهَا الْعَزِیْزُ مَسَّنَا وَاَهْلَنَا الضُّرُّ وَجِئْنَا بِبِضَاعَةٍ مُّزْجٰىةٍ فَاَوْفِ لَنَا الْكَیْلَ وَتَصَدَّقْ عَلَیْنَا ؕ— اِنَّ اللّٰهَ یَجْزِی الْمُتَصَدِّقِیْنَ ۟

८८. मग जेव्हा हे लोक यूसुफजवळ पोहोचले, तेव्हा म्हणू लागले की हे अजीज! आम्ही आणि आमचे कुटुंब अतिशय अडचणीत आहे, आम्ही थोडीशी तुच्छ पुंजी आणली आहे, परंतु तुम्ही आम्हाला धान्याचे पूर्ण माप देऊन टाका आणि आम्हाला दान म्हणून द्या. निश्चितच अल्लाह दान देणाऱ्यांना चांगला मोबदला देतो. info
التفاسير:

external-link copy
89 : 12

قَالَ هَلْ عَلِمْتُمْ مَّا فَعَلْتُمْ بِیُوْسُفَ وَاَخِیْهِ اِذْ اَنْتُمْ جٰهِلُوْنَ ۟

८९. (यूसुफ) म्हणाले, तुमच्या ध्यानात तरी आहे का की तुम्ही यूसुफ आणि त्याच्या भावाशी आपल्या नादानपणात काय काय केले? info
التفاسير:

external-link copy
90 : 12

قَالُوْۤا ءَاِنَّكَ لَاَنْتَ یُوْسُفُ ؕ— قَالَ اَنَا یُوْسُفُ وَهٰذَاۤ اَخِیْ ؗ— قَدْ مَنَّ اللّٰهُ عَلَیْنَا ؕ— اِنَّهٗ مَنْ یَّتَّقِ وَیَصْبِرْ فَاِنَّ اللّٰهَ لَا یُضِیْعُ اَجْرَ الْمُحْسِنِیْنَ ۟

९०. ते म्हणाले, काय (खरोखर) तूच यूसुफ आहेस? उत्तर दिले, होय! मीच तो यूसुफ आणि हा माझा भाऊ आहे. अल्लाहने आमच्यावर दया आणि कृपा केली. खरी गोष्ट अशी की जो कोणी अल्लाहचे भय राखून दुराचारापासून अलिप्त राहील आणि धीर-संयम राखील तर अल्लाह एखाद्या सत्कर्म करणाऱ्याचा मोबदला वाया जाऊ देत नाही. info
التفاسير:

external-link copy
91 : 12

قَالُوْا تَاللّٰهِ لَقَدْ اٰثَرَكَ اللّٰهُ عَلَیْنَا وَاِنْ كُنَّا لَخٰطِـِٕیْنَ ۟

९१. ते म्हणाले, अल्लाहची शपथ! अल्लाहने तुला आमच्यावर श्रेष्ठता प्रदान केली आहे आणि हेही सत्य आहे की आम्ही अपराधी आहोत. info
التفاسير:

external-link copy
92 : 12

قَالَ لَا تَثْرِیْبَ عَلَیْكُمُ الْیَوْمَ ؕ— یَغْفِرُ اللّٰهُ لَكُمْ ؗ— وَهُوَ اَرْحَمُ الرّٰحِمِیْنَ ۟

९२. उत्तर दिले, आज तुमच्यावर कसलाही आरोप नाही, अल्लाह तुम्हाला माफ करो, तो तर समस्त दया करणाऱ्यांमध्ये सर्वात मोठा दया करणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
93 : 12

اِذْهَبُوْا بِقَمِیْصِیْ هٰذَا فَاَلْقُوْهُ عَلٰی وَجْهِ اَبِیْ یَاْتِ بَصِیْرًا ۚ— وَاْتُوْنِیْ بِاَهْلِكُمْ اَجْمَعِیْنَ ۟۠

९३. माझा हा सदरा तुम्ही घेऊन जा आणि तो माझ्या पित्याच्या तोंडावर टाका की (ज्यामुळे) ते पाहू लागतील आणि येतील आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला माझ्याजवळ घेऊन या. info
التفاسير:

external-link copy
94 : 12

وَلَمَّا فَصَلَتِ الْعِیْرُ قَالَ اَبُوْهُمْ اِنِّیْ لَاَجِدُ رِیْحَ یُوْسُفَ لَوْلَاۤ اَنْ تُفَنِّدُوْنِ ۟

९४. आणि जेव्हा हा काफिला (मायदेशी) निघाला, तेव्हा त्यांचे पिता (याकूब) म्हणाले, मला यूसुफचा सुगंध येत आहे, जर तुम्ही मला मूर्ख समजत नसाल. info
التفاسير:

external-link copy
95 : 12

قَالُوْا تَاللّٰهِ اِنَّكَ لَفِیْ ضَلٰلِكَ الْقَدِیْمِ ۟

९५. (पुत्र) म्हणू लागले की अल्लाहची शपथ! तुम्ही तर अजूनही आपल्या त्याच जुन्या चुकीवर कायम आहात! info
التفاسير: