(१) मूळ शब्द ‘तवक्कल’ (भरवसा) अर्थात बाह्य साधनांचा अवलंब केल्यानंतर मामला अल्लाहच्या हवाली केला जावा. भरवशाचा अर्थ हा नव्हे की साधनांचा प्रयोग न करताच अल्लाहवर भरवसा राखला जावा, असे करण्यापासून आम्हाल रोखले गेले आहे. एकाद एक मनुष्य पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या सेवेत हजर झाला आणि उंटाला तसेच बाहेर उभे करून आत आला. पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी विचारले असता म्हणाला की मी उंटाला अल्लाहच्या हवाली करून आलो आहे. त्यावर पैगंबर म्हणाले, हा भरवसा नव्हे. ‘आकल व तवक्कल’ (‘‘आधी त्याला बांध, नंतर अल्लाहवर भरवसा कर.’’ (तिर्मिजी)
(१) अर्थात त्यांना मुस्लिम बनवून तुमचा बांधव आणि साथीदार बनवावे, ज्यामुळे तुमची आपसातील शत्रुता, मैत्रीत रुपांतर होईल आणि असेच घडले. मक्का विजयानंतर लोक समूहासमूहांनी इस्लाम धर्म स्वीकारू लागले आणि ते मुस्लिम होताच घृणाचे रूपांतर प्रेमात झाले. कालपर्यंत जे मुलसमानांचे रक्तपिपासू वैरी होते, ते त्यांचे जीवश्च कंठश्च बनले.