Kur'an-ı Kerim meal tercümesi - Marathi Dili Tercüme - Muhammed Şefi' Ensari

Sûratu'l-En'âm

external-link copy
1 : 6

اَلْحَمْدُ لِلّٰهِ الَّذِیْ خَلَقَ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضَ وَجَعَلَ الظُّلُمٰتِ وَالنُّوْرَ ؕ۬— ثُمَّ الَّذِیْنَ كَفَرُوْا بِرَبِّهِمْ یَعْدِلُوْنَ ۟

१. सर्व प्रशंसा त्या अल्लाहकरिता आहे, ज्याने आकाशांना व जमिनीला निर्माण केले आणि अंधःकार व प्रकाश बनविला तरीदेखील ईमान न राखणारे लोक (इतरांना) आपल्या पालनकर्त्याच्या बरोबरीचा मानतात. info
التفاسير:

external-link copy
2 : 6

هُوَ الَّذِیْ خَلَقَكُمْ مِّنْ طِیْنٍ ثُمَّ قَضٰۤی اَجَلًا ؕ— وَاَجَلٌ مُّسَمًّی عِنْدَهٗ ثُمَّ اَنْتُمْ تَمْتَرُوْنَ ۟

२. त्यानेच तुम्हाला मातीपासून घडविले, मग एक अवधी ठरविला आणि एक निर्धारीत अवधी त्याच्याजवळ आहे तरीही तुम्ही संशयात पडले आहाता? info
التفاسير:

external-link copy
3 : 6

وَهُوَ اللّٰهُ فِی السَّمٰوٰتِ وَفِی الْاَرْضِ ؕ— یَعْلَمُ سِرَّكُمْ وَجَهْرَكُمْ وَیَعْلَمُ مَا تَكْسِبُوْنَ ۟

३. आणि तोच अल्लाह आहे आकाशांमध्ये आणि जमिनीवर. तो तुमचे गुप्त भेद व जाहीर सर्व काही जाणतो आणि तुमच्या कमाईला जाणून आहे.१ info

(१) ‘अहले सुन्नत’ अर्थात ‘सलफ’ची श्रद्धा आहे की अल्लाह स्वतः अर्शवर आहे. जसा तो प्रशंसनीय आहे. परंतु आपल्या ज्ञानाच्या आधारे तो सर्व ठिकाणी आहे. अर्थात त्याच्या ज्ञानकक्षेच्या बाहेर काहीही नाही. तथापि काही लोकांच्या मते तो अर्शवर नाही तर सर्व ठिकाणी आहे आणि ते या आयतीद्वआरे आपल्या धारणेचे(आकिदा) समर्थन करतात की ती शक्ती जिला आकाशांमध्ये व धरतीवर ‘अल्लाह’ म्हणून पुकारतात आणि आकाशांमध्ये व धरतीवर जिची राज्यसत्ता आहे. आणि या दोन्ही ठिकाणी जिला उपास्य समजले जाते ती शक्ती अर्थात अल्लाह तुमचे प्रकट-अप्रकट सर्व कर्म चांगल्या प्रकारे जाणतो. (फतहुल कदीर) याचे दुसरे प्रमाणही प्रस्तुत केले गेले आहे, जे धर्माचे सखोल ज्ञान बाळगणाऱ्या विद्वानांच्या भाष्यात आढळते. उदा. ‘तफसीर तबरी’ आणि ‘इब्ने कसीर’ वगैरे.

التفاسير:

external-link copy
4 : 6

وَمَا تَاْتِیْهِمْ مِّنْ اٰیَةٍ مِّنْ اٰیٰتِ رَبِّهِمْ اِلَّا كَانُوْا عَنْهَا مُعْرِضِیْنَ ۟

४. आणि त्यांच्याजवळ त्यांच्या पालनकर्त्याच्या निशाण्यांपैकी कोणतीही निशाणी आणली गेली तरीही ते तिच्यापासून तोंड फिरवितात. info
التفاسير:

external-link copy
5 : 6

فَقَدْ كَذَّبُوْا بِالْحَقِّ لَمَّا جَآءَهُمْ ؕ— فَسَوْفَ یَاْتِیْهِمْ اَنْۢبٰٓؤُا مَا كَانُوْا بِهٖ یَسْتَهْزِءُوْنَ ۟

५. त्यांनी त्या सत्य-ग्रंथालाही खोटे ठरविले, जेव्हा तो त्यांच्याजवळ येऊन पोहोचला तेव्हा लवकरच त्यांना खबर मिळेल त्या गोष्टीची जिची ते थट्टा उडवित होते. info
التفاسير:

external-link copy
6 : 6

اَلَمْ یَرَوْا كَمْ اَهْلَكْنَا مِنْ قَبْلِهِمْ مِّنْ قَرْنٍ مَّكَّنّٰهُمْ فِی الْاَرْضِ مَا لَمْ نُمَكِّنْ لَّكُمْ وَاَرْسَلْنَا السَّمَآءَ عَلَیْهِمْ مِّدْرَارًا ۪— وَّجَعَلْنَا الْاَنْهٰرَ تَجْرِیْ مِنْ تَحْتِهِمْ فَاَهْلَكْنٰهُمْ بِذُنُوْبِهِمْ وَاَنْشَاْنَا مِنْ بَعْدِهِمْ قَرْنًا اٰخَرِیْنَ ۟

६. काय त्यांनी पाहिले नाही की आम्ही त्यांच्यापूर्वी कित्येक जनसमूहांना नष्ट करून टाकले, ज्यांना आम्ही या जगात एवढे सामर्थ्य प्रदान केले होते तसे तुम्हालाही प्रदान केले नाही आणि आम्ही त्यांच्यावर मुसळधार पाऊस पाडला आणि आम्ही त्यांच्या खालून जलप्रवाह जारी केले, मग आम्ही त्यांना त्यांच्या अपराधांपायी बरबाद करून टाकले आणि त्यांच्यानंतर दुसरा जनसमूह निर्माण केला. info
التفاسير:

external-link copy
7 : 6

وَلَوْ نَزَّلْنَا عَلَیْكَ كِتٰبًا فِیْ قِرْطَاسٍ فَلَمَسُوْهُ بِاَیْدِیْهِمْ لَقَالَ الَّذِیْنَ كَفَرُوْۤا اِنْ هٰذَاۤ اِلَّا سِحْرٌ مُّبِیْنٌ ۟

७. आणि जर आम्ही कागदावर लिहिलेला एखादा ग्रंथ जरी तुमच्यावर उतरविला असता, आणि त्यास या लोकांनी आपल्या हातांनी स्पर्शही केला असता, तरीदेखील हे इन्कारी लोक असेच म्हणाले असते की ही तर उघड जादू आहे आणखी काही नाही. info
التفاسير:

external-link copy
8 : 6

وَقَالُوْا لَوْلَاۤ اُنْزِلَ عَلَیْهِ مَلَكٌ ؕ— وَلَوْ اَنْزَلْنَا مَلَكًا لَّقُضِیَ الْاَمْرُ ثُمَّ لَا یُنْظَرُوْنَ ۟

८. आणि ते म्हणाले, तुमच्यावर एखादाा फरिश्ता का नाही उतरविला गेला? आणि जर आम्ही फरिश्ता उतरविला असता तर सारा किस्साच पूर्ण झाला असता, मग त्यांना (थोडासाही) अवसर दिला गेला नसता. info
التفاسير: