Kur'an-ı Kerim meal tercümesi - Marathi Dili Tercüme - Muhammed Şefi' Ensari

Sayfa numarası:close

external-link copy
48 : 43

وَمَا نُرِیْهِمْ مِّنْ اٰیَةٍ اِلَّا هِیَ اَكْبَرُ مِنْ اُخْتِهَا ؗ— وَاَخَذْنٰهُمْ بِالْعَذَابِ لَعَلَّهُمْ یَرْجِعُوْنَ ۟

४८. आणि आम्ही जी निशाणी त्यांना दाखवित होतो, ती दुसऱ्या निशाणीपेक्षा सरस असे, आणि आम्ही त्यांना शिक्षा - यातनेत धरले, यासाठी की त्यांनी रुजू करावे. info
التفاسير:

external-link copy
49 : 43

وَقَالُوْا یٰۤاَیُّهَ السّٰحِرُ ادْعُ لَنَا رَبَّكَ بِمَا عَهِدَ عِنْدَكَ ۚ— اِنَّنَا لَمُهْتَدُوْنَ ۟

४९. आणि ते म्हणाले, हे जादूगार! आमच्यासाठी आपल्या पालनकर्त्याला त्या गोष्टीची दुआ-प्रार्थना कर जिचा त्याने तुला वायदा दिलेला आहे विश्वास कर की आम्ही सर्न्माला लागू. info
التفاسير:

external-link copy
50 : 43

فَلَمَّا كَشَفْنَا عَنْهُمُ الْعَذَابَ اِذَا هُمْ یَنْكُثُوْنَ ۟

५०. मग जेव्हा आम्ही त्यांच्यावरून तो अज़ाब हटविला तेव्हा त्यांनी त्याच वेळी आपला वायदा व आपल्या वचनाचा भंग केला. info
التفاسير:

external-link copy
51 : 43

وَنَادٰی فِرْعَوْنُ فِیْ قَوْمِهٖ قَالَ یٰقَوْمِ اَلَیْسَ لِیْ مُلْكُ مِصْرَ وَهٰذِهِ الْاَنْهٰرُ تَجْرِیْ مِنْ تَحْتِیْ ۚ— اَفَلَا تُبْصِرُوْنَ ۟ؕ

५१. आणि फिरऔनने आपल्या जनसमूहात ऐलान करविले व म्हणाला, हे माझ्या जमातीच्या लोकानो! काय मिस्रचा देश माझा नाही, आणि माझ्या राजमहालांच्या खाली जे हे जलप्रवाह वाहत आहेत, काय तुम्ही पाहात नाही? info
التفاسير:

external-link copy
52 : 43

اَمْ اَنَا خَیْرٌ مِّنْ هٰذَا الَّذِیْ هُوَ مَهِیْنٌ ۙ۬— وَّلَا یَكَادُ یُبِیْنُ ۟

५२. किंबहुना मी श्रेष्ठतम आहे याच्या तुलनेत जो तुच्छ आहे आणि साफ (स्पष्टपणे) बोलूही शकत नाही. info
التفاسير:

external-link copy
53 : 43

فَلَوْلَاۤ اُلْقِیَ عَلَیْهِ اَسْوِرَةٌ مِّنْ ذَهَبٍ اَوْ جَآءَ مَعَهُ الْمَلٰٓىِٕكَةُ مُقْتَرِنِیْنَ ۟

५३. बरे, याच्यावर सोन्याची कांकणे का नाही अवतरित झालीत, किंवा याच्यासोबत फरिश्तेच झुंडीने (गोळा होऊन) आले असते. info
التفاسير:

external-link copy
54 : 43

فَاسْتَخَفَّ قَوْمَهٗ فَاَطَاعُوْهُ ؕ— اِنَّهُمْ كَانُوْا قَوْمًا فٰسِقِیْنَ ۟

५४. तेव्हा त्याने आपल्या जनसमूहाच्या लोकांना मूर्ख बनविले आणि त्यांनी त्याचे म्हणणे मानले. निःसंशय, ते सर्व दुराचारी लोक होते. info
التفاسير:

external-link copy
55 : 43

فَلَمَّاۤ اٰسَفُوْنَا انْتَقَمْنَا مِنْهُمْ فَاَغْرَقْنٰهُمْ اَجْمَعِیْنَ ۟ۙ

५५. मग जेव्हा त्यांनी आम्हाला क्रोधित केले, तेव्हा आम्ही त्यांचा सूड घेतला आणि सर्वांना (समुद्रात) बुडवून टाकले. info
التفاسير:

external-link copy
56 : 43

فَجَعَلْنٰهُمْ سَلَفًا وَّمَثَلًا لِّلْاٰخِرِیْنَ ۟۠

५६. तेव्हा आम्ही त्यांना भूतकालीन करून टाकले आणि नंतरच्या लोकांकरिता नमूना बनविले. info
التفاسير:

external-link copy
57 : 43

وَلَمَّا ضُرِبَ ابْنُ مَرْیَمَ مَثَلًا اِذَا قَوْمُكَ مِنْهُ یَصِدُّوْنَ ۟

५७. आणि जेव्हा मरियमच्या पुत्राचे उदाहरण सांगितले गेले, तेव्हा त्या वृत्तांताने तुमचा जनसमूह (आनंदाने) ओरडला. info
التفاسير:

external-link copy
58 : 43

وَقَالُوْۤا ءَاٰلِهَتُنَا خَیْرٌ اَمْ هُوَ ؕ— مَا ضَرَبُوْهُ لَكَ اِلَّا جَدَلًا ؕ— بَلْ هُمْ قَوْمٌ خَصِمُوْنَ ۟

५८. आणि ते म्हणाले की आमची उपास्ये चांगली आहेत की तो? तुम्हाला त्यांचे हे सांगणे केवळ वाद घालण्याच्या हेतूने आहे, किंबहुना हे लोक आहेतच भांडखोर. info
التفاسير:

external-link copy
59 : 43

اِنْ هُوَ اِلَّا عَبْدٌ اَنْعَمْنَا عَلَیْهِ وَجَعَلْنٰهُ مَثَلًا لِّبَنِیْۤ اِسْرَآءِیْلَ ۟ؕ

५९. तो (ईसा अलै.) देखील केवळ एक दास मात्र आहे, ज्याच्यावर आम्ही उपकार केला आणि त्याला इस्राईलच्या संततीकरिता (आपल्या सामर्थ्याची) निशाणी बनविले. info
التفاسير:

external-link copy
60 : 43

وَلَوْ نَشَآءُ لَجَعَلْنَا مِنْكُمْ مَّلٰٓىِٕكَةً فِی الْاَرْضِ یَخْلُفُوْنَ ۟

६०. जर आम्ही इच्छिले असते तर तुमच्याऐवजी फरिश्ते बनविले असते ज्यांनी धरतीवर एकमेकांचे वारस म्हणून काम केले असते. info
التفاسير: