Kur'an-ı Kerim meal tercümesi - Marathi Dili Tercüme - Muhammed Şefi' Ensari

external-link copy
5 : 22

یٰۤاَیُّهَا النَّاسُ اِنْ كُنْتُمْ فِیْ رَیْبٍ مِّنَ الْبَعْثِ فَاِنَّا خَلَقْنٰكُمْ مِّنْ تُرَابٍ ثُمَّ مِنْ نُّطْفَةٍ ثُمَّ مِنْ عَلَقَةٍ ثُمَّ مِنْ مُّضْغَةٍ مُّخَلَّقَةٍ وَّغَیْرِ مُخَلَّقَةٍ لِّنُبَیِّنَ لَكُمْ ؕ— وَنُقِرُّ فِی الْاَرْحَامِ مَا نَشَآءُ اِلٰۤی اَجَلٍ مُّسَمًّی ثُمَّ نُخْرِجُكُمْ طِفْلًا ثُمَّ لِتَبْلُغُوْۤا اَشُدَّكُمْ ۚ— وَمِنْكُمْ مَّنْ یُّتَوَفّٰی وَمِنْكُمْ مَّنْ یُّرَدُّ اِلٰۤی اَرْذَلِ الْعُمُرِ لِكَیْلَا یَعْلَمَ مِنْ بَعْدِ عِلْمٍ شَیْـًٔا ؕ— وَتَرَی الْاَرْضَ هَامِدَةً فَاِذَاۤ اَنْزَلْنَا عَلَیْهَا الْمَآءَ اهْتَزَّتْ وَرَبَتْ وَاَنْۢبَتَتْ مِنْ كُلِّ زَوْجٍ بَهِیْجٍ ۟

५. लोकांनो! जर तुम्हाला मेल्यानंतर (पुन्हा) जिवंत होण्याबाबत शंका आहे, तर विचार करा, आम्ही तुम्हाला मातीपासून निर्माण केले, मग वीर्यापासून, मग जमलेल्या रक्तापासून, आणि मांसाच्या तुकड्यापासून जे रूप दिले गेले होते आणि विनारूपही होते. हे आम्ही तुमच्यावर स्पष्ट करतो आणि आम्ही ज्याला इच्छितो एका निर्धारित अवधीपर्यंत मातेच्या उदरात ठेवतो, मग तुम्हाला बाळाच्या रूपाने या जगात आणतो मग यासाठी की तुम्ही आपल्या पूर्ण तरुणपणास पोहचावे, तुमच्यापैकी काही असे आहेत जे मरण पावतात आणि काही जीर्ण वयाकडे पुन्हा परतविले जातात की ते एका गोष्टीशी परिचित झाल्यानंतर दुसऱ्यांदा अनभिज्ञ व्हावेत. तुम्ही पाहता की जमीन नापीक आणि कोरडी आहे, मग जेव्हा आम्ही तिच्यावर पाऊस पाडतो तेव्हा ती चेतनामय होते आणि फुगते आणि प्रत्येक प्रकारची सुंदर वनस्पती उगविते. info
التفاسير: