Kur'an-ı Kerim meal tercümesi - Marathi Dili Tercüme - Muhammed Şefi' Ensari

Sayfa numarası:close

external-link copy
104 : 12

وَمَا تَسْـَٔلُهُمْ عَلَیْهِ مِنْ اَجْرٍ ؕ— اِنْ هُوَ اِلَّا ذِكْرٌ لِّلْعٰلَمِیْنَ ۟۠

१०४. आणि तुम्ही त्यांच्याकडून याबद्दल काही मजूरी मागत नाही, हा तर समस्त विश्वाकरिता बोध-उपदेश आहे. info
التفاسير:

external-link copy
105 : 12

وَكَاَیِّنْ مِّنْ اٰیَةٍ فِی السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ یَمُرُّوْنَ عَلَیْهَا وَهُمْ عَنْهَا مُعْرِضُوْنَ ۟

१०५. आणि आकाशांमध्ये आणि धरतीत अनेक निशाण्या आहेत, ज्यांच्यापासून हे लोक तोंड फिरवून निघून जातात. info
التفاسير:

external-link copy
106 : 12

وَمَا یُؤْمِنُ اَكْثَرُهُمْ بِاللّٰهِ اِلَّا وَهُمْ مُّشْرِكُوْنَ ۟

१०६. आणि त्यांच्यापैकी बहुतेक लोक अल्लाहवर ईमान राखत असतानाही शिर्क करणारे आहेत.१ info

(१) ही ती वस्तुस्थिती आहे, जिला कुरआनाने अनेक ठिकाणी स्पष्टपणे सांगितले आहे की हे मूर्तीपूजक हे मान्य करतात की आकाश व धरतीचा रचयिता, स्वामी, पालनहार आणि संचालक केवळ अल्लाहच आहे, तरीही ते उपासनेत अल्लाहसोबत इतरांनाही सामील करतात. अशा प्रकारे अधिकांश लोक अनेकेश्वरवादी आहेत अर्थात प्रत्येक कालखंडातील लोक तौहीद (एकेश्वरवाद) उपासना मानण्यास तयार होत नाही. आजच्या काळात कबरींची पूजा करणाऱ्यांचा शिर्कही असाच आहे की ते कबरीत गाडल्या गेलेल्या बुजूर्गांना उपास्य समजून त्यांना मदतीसाठी पुकारतात आणि अनेकविध उपासना पद्धती अंगीकारतात.

التفاسير:

external-link copy
107 : 12

اَفَاَمِنُوْۤا اَنْ تَاْتِیَهُمْ غَاشِیَةٌ مِّنْ عَذَابِ اللّٰهِ اَوْ تَاْتِیَهُمُ السَّاعَةُ بَغْتَةً وَّهُمْ لَا یَشْعُرُوْنَ ۟

१०७. काय ते या गोष्टीपासून निर्भय झाले आहेत की त्यांच्याजवळ अल्लाहच्या शिक्षा-यातनांपैकी एखादी सर्वसामान्य शिक्षा यावी किंवा त्यांच्यावर अचानक कयामत येऊन कोसळावी आणि ते गाफील असावेत. info
التفاسير:

external-link copy
108 : 12

قُلْ هٰذِهٖ سَبِیْلِیْۤ اَدْعُوْۤا اِلَی اللّٰهِ ؔ۫— عَلٰی بَصِیْرَةٍ اَنَا وَمَنِ اتَّبَعَنِیْ ؕ— وَسُبْحٰنَ اللّٰهِ وَمَاۤ اَنَا مِنَ الْمُشْرِكِیْنَ ۟

१०८. (तुम्ही) सांगा, माझा हाच मार्ग आहे. मी आणि माझे अनुयायी अल्लाहकडे बोलावित आहेत पूर्ण विश्वास आणि श्रद्धेसह १ आणि अल्लाह पवित्र आहे आणि मी अनेकेश्वरवाद्यांपैकी नाही. info

(१) अर्थात तौहीद (एकेश्वरवाद) चा मार्ग हाच माझा मार्ग आहे, किंबहुना समस्त पैगंबरांचाही हाच मार्ग होता. याच मार्गाकडे मी आणि माझे अनुयायी मजबूत ईमानासह आणि धार्मिक नियमांच्या प्रमाणासह लोकांना आवाहन करतो.

التفاسير:

external-link copy
109 : 12

وَمَاۤ اَرْسَلْنَا مِنْ قَبْلِكَ اِلَّا رِجَالًا نُّوْحِیْۤ اِلَیْهِمْ مِّنْ اَهْلِ الْقُرٰی ؕ— اَفَلَمْ یَسِیْرُوْا فِی الْاَرْضِ فَیَنْظُرُوْا كَیْفَ كَانَ عَاقِبَةُ الَّذِیْنَ مِنْ قَبْلِهِمْ ؕ— وَلَدَارُ الْاٰخِرَةِ خَیْرٌ لِّلَّذِیْنَ اتَّقَوْا ؕ— اَفَلَا تَعْقِلُوْنَ ۟

१०९. आणि तुमच्यापूर्वी आम्ही वस्तीवाल्यांमध्ये जेवढेदेखील पैगंबर पाठविले ते सर्व पुरुषच होते, ज्यांच्याकडे आम्ही वहयी (प्रकाशना) उतरवित राहिली काय धरतीवर या लोकांनी हिंडून फिरून पाहिले नाही की त्यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांचा कसा परिणाम (अंत) झाला? निःसंशय, अल्लाहचे भय राखणाऱ्या व त्याचा आज्ञाभंग करण्यापासून दूर राहणाऱ्या लोकांकरिता आखिरतचे घर फार उत्तम आहे. काय तरीही तुम्ही ध्यानी घेत नाही? info
التفاسير:

external-link copy
110 : 12

حَتّٰۤی اِذَا اسْتَیْـَٔسَ الرُّسُلُ وَظَنُّوْۤا اَنَّهُمْ قَدْ كُذِبُوْا جَآءَهُمْ نَصْرُنَا ۙ— فَنُجِّیَ مَنْ نَّشَآءُ ؕ— وَلَا یُرَدُّ بَاْسُنَا عَنِ الْقَوْمِ الْمُجْرِمِیْنَ ۟

११०. येथेपर्यंत की जेव्हा पैगंबर निराश होऊ लागले आणि उम्मत (जनसमुदाया) चे लोक असे समजू लागले की त्यांना खोटे सांगितले गेले, त्वरित त्यांच्यापर्यंत आमची मदत येऊन पोहोचली. आम्ही ज्याला इच्छिले त्याला सुटका प्रदान केली. खरी गोष्ट अशी की आमचा अज़ाब (शिक्षा-यातना) अपराधी लोकांवरून टाळला जात नाही. info
التفاسير:

external-link copy
111 : 12

لَقَدْ كَانَ فِیْ قَصَصِهِمْ عِبْرَةٌ لِّاُولِی الْاَلْبَابِ ؕ— مَا كَانَ حَدِیْثًا یُّفْتَرٰی وَلٰكِنْ تَصْدِیْقَ الَّذِیْ بَیْنَ یَدَیْهِ وَتَفْصِیْلَ كُلِّ شَیْءٍ وَّهُدًی وَّرَحْمَةً لِّقَوْمٍ یُّؤْمِنُوْنَ ۟۠

१११. यांच्या कहाण्यां (वृत्तांता) मध्ये बुद्धिमानांकरिता निश्चितच बोध आणि तंबी आहे. हा कुरआन काही खोट्या रचलेल्या गोष्टी नाही, किंबहुना हे सत्य-समर्थन आहे त्या ग्रंथांचे जे याच्या पूर्वीचे आहेत, आणि प्रत्येक गोष्टीचे सविस्तर वर्णन आणि मार्गदर्शन व दया-कृपा आहे ईमान राखणाऱ्यांकरिता. info
التفاسير: