ශුද්ධවූ අල් කුර්ආන් අර්ථ කථනය - මරාති පරිවර්තනය - මුහම්මද් ෂෆීඃ අන්සාරි

external-link copy
35 : 5

یٰۤاَیُّهَا الَّذِیْنَ اٰمَنُوا اتَّقُوا اللّٰهَ وَابْتَغُوْۤا اِلَیْهِ الْوَسِیْلَةَ وَجَاهِدُوْا فِیْ سَبِیْلِهٖ لَعَلَّكُمْ تُفْلِحُوْنَ ۟

३५. हे ईमान राखणाऱ्यांनो! अल्लाहचे भय बाळगून राहा आणि त्याच्या दिशेने सान्निध्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करा१ आणि त्याच्या मार्गात जिहाद करा, यासाठी की तुम्हाला सफलता लाभावी. info

(१) मूळ शब्द ‘वसीला’ अर्थात हेतुप्राप्तीसाठी व निकटता प्राप्त करण्यासाठी प्रयोगात आणले जाणारे माध्यम. ‘अल्लाहचे जवळीक प्राप्त करण्याचे साधन शोधा’चा खरा अर्थ असे कर्म की ज्यामुळे तुम्हाला अल्लाहची मर्जी आणि त्याचे जवळीव लाभावे. इमाम शौकानीच्या कथनानुसार वसीला म्हणजे ते सत्कर्म की ज्याद्वारे मनुष्य अल्लाहचे जवळीव प्राप्त करतो. त्याचप्रमाणे वर्जित आणि हराम केलेल्या वस्तू आणि कर्मापासून अलिप्त राहिल्यानेही अल्लाहचे जवळीक प्राप्त होते. तथापि मूर्ख लोकांनी हे खरे माध्यम सोडून कबरीत गाडल्या गेलेल्या लोकांना आपला ‘वसीला’ बनवून घेतले आहे, ज्याला इस्लामी धर्मशास्त्रात तिळमात्र जागा नाही.

التفاسير: