ශුද්ධවූ අල් කුර්ආන් අර්ථ කථනය - මරාති පරිවර්තනය - මුහම්මද් ෂෆීඃ අන්සාරි

මර්යම්

external-link copy
1 : 19

كٓهٰیٰعٓصٓ ۟

१. काफ. हा. या. एैन. श्वाद. info
التفاسير:

external-link copy
2 : 19

ذِكْرُ رَحْمَتِ رَبِّكَ عَبْدَهٗ زَكَرِیَّا ۟ۖۚ

२. हा उल्लेख आहे तुमच्या पालनकर्त्याच्या त्या कृपेचा, जी त्याने आपले दास जकरियावर केली होती. info
التفاسير:

external-link copy
3 : 19

اِذْ نَادٰی رَبَّهٗ نِدَآءً خَفِیًّا ۟

३. जेव्हा त्यांनी आपल्या पालनकर्त्याजवळ गुपचुप रित्या प्रार्थना केली info
التفاسير:

external-link copy
4 : 19

قَالَ رَبِّ اِنِّیْ وَهَنَ الْعَظْمُ مِنِّیْ وَاشْتَعَلَ الرَّاْسُ شَیْبًا وَّلَمْ اَكُنْ بِدُعَآىِٕكَ رَبِّ شَقِیًّا ۟

४. म्हणाले हे माझ्या पालनकर्त्या माझी हाडे कमकुवत झाली आहेत आणि डोके म्हातारपणामुळे भडकले आहे, परंतु मी कधीही तुझ्याजवळ दुआ (प्रार्थना) करून वंचित राहिलो नाही. info
التفاسير:

external-link copy
5 : 19

وَاِنِّیْ خِفْتُ الْمَوَالِیَ مِنْ وَّرَآءِیْ وَكَانَتِ امْرَاَتِیْ عَاقِرًا فَهَبْ لِیْ مِنْ لَّدُنْكَ وَلِیًّا ۟ۙ

५. आणि मला आपल्या (मृत्यु) नंतर, आपल्या जवळच्या नातेवाईकांचे भय आहे. माझी पत्नी देखील वांझ आहे, पण तरीही तू मला आपल्यातर्फे वारस प्रदान कर. info
التفاسير:

external-link copy
6 : 19

یَّرِثُنِیْ وَیَرِثُ مِنْ اٰلِ یَعْقُوْبَ ۗ— وَاجْعَلْهُ رَبِّ رَضِیًّا ۟

६. जो माझाही वारस असेल आणि याकूबच्या वंशाचाही वारस, आणि हे माझ्या पालनकर्त्या! तू त्याला आपला आवडता दास बनव. info
التفاسير:

external-link copy
7 : 19

یٰزَكَرِیَّاۤ اِنَّا نُبَشِّرُكَ بِغُلٰمِ ١سْمُهٗ یَحْیٰی ۙ— لَمْ نَجْعَلْ لَّهٗ مِنْ قَبْلُ سَمِیًّا ۟

७. हे जकरिया! आम्ही तुम्हाला एका पुत्रा (च्या प्राप्ती) ची खूशखबर देतो, ज्याचे नाव यहया आहे. आम्ही त्यांच्यापूर्वी या नावासारखे नाव कोणालाही दिले नाही. info
التفاسير:

external-link copy
8 : 19

قَالَ رَبِّ اَنّٰی یَكُوْنُ لِیْ غُلٰمٌ وَّكَانَتِ امْرَاَتِیْ عَاقِرًا وَّقَدْ بَلَغْتُ مِنَ الْكِبَرِ عِتِیًّا ۟

८. (जकरिया) म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! मला पुत्र कसा बरे होईल, माझी पत्नी वांझ आणि मी स्वतः म्हातारपणाच्या अतिशय कमकुवत अवस्थेस पोहोचलो आहे. info
التفاسير:

external-link copy
9 : 19

قَالَ كَذٰلِكَ ۚ— قَالَ رَبُّكَ هُوَ عَلَیَّ هَیِّنٌ وَّقَدْ خَلَقْتُكَ مِنْ قَبْلُ وَلَمْ تَكُ شَیْـًٔا ۟

९. आदेश झाला की (वायदा) अशाच प्रकारे पूर्ण झाला. तुमच्या पालनकर्त्याने फर्माविले आहे की माझ्याकरिता तर हे अगदी सोपे आहे आणि तुम्ही स्वतः जेव्हा काहीच नव्हता, मी तुम्हाला निर्माण केले आहे. info
التفاسير:

external-link copy
10 : 19

قَالَ رَبِّ اجْعَلْ لِّیْۤ اٰیَةً ؕ— قَالَ اٰیَتُكَ اَلَّا تُكَلِّمَ النَّاسَ ثَلٰثَ لَیَالٍ سَوِیًّا ۟

१०. (जकरिया) म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! माझ्यासाठी एखादी निशाणी निर्धारीत कर, आदेश दिला की तुमच्यासाठी निशाणी ही की प्रकृती धडधाकट असतानाही तुम्ही तीन रात्री पर्यंत कोणत्याही माणसाशी बोलू शकणार नाहीत. info
التفاسير:

external-link copy
11 : 19

فَخَرَجَ عَلٰی قَوْمِهٖ مِنَ الْمِحْرَابِ فَاَوْحٰۤی اِلَیْهِمْ اَنْ سَبِّحُوْا بُكْرَةً وَّعَشِیًّا ۟

११. आता जकरिया आपल्या खोली (हुजऱ्या) च्या बाहेर येऊन आपल्या जनसमूहाजवळ येऊन त्यांना इशारा करतात की तुम्ही सकाळ-संध्याकाळ अल्लाहची पवित्रता वर्णन करा. info
التفاسير: