ශුද්ධවූ අල් කුර්ආන් අර්ථ කථනය - මරාති පරිවර්තනය - මුහම්මද් ෂෆීඃ අන්සාරි

පිටු අංක:close

external-link copy
29 : 11

وَیٰقَوْمِ لَاۤ اَسْـَٔلُكُمْ عَلَیْهِ مَالًا ؕ— اِنْ اَجْرِیَ اِلَّا عَلَی اللّٰهِ وَمَاۤ اَنَا بِطَارِدِ الَّذِیْنَ اٰمَنُوْا ؕ— اِنَّهُمْ مُّلٰقُوْا رَبِّهِمْ وَلٰكِنِّیْۤ اَرٰىكُمْ قَوْمًا تَجْهَلُوْنَ ۟

२९. हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! मी याच्या मोबदल्यात तुमच्याकडून कसलेही धन मागत नाही. माझा मोबदला तर केवळ सर्वश्रेष्ठ अल्लाहजवळ आहे, ना मी ईमानधारकांना आपल्या जवळून दूर करू शकतो, त्यांना आपल्या पालनकर्त्याशी भेटायचे आहे. परंतु मी असे पाहतो की तुम्ही लोक मूर्खपणा करीत आहात. info
التفاسير:

external-link copy
30 : 11

وَیٰقَوْمِ مَنْ یَّنْصُرُنِیْ مِنَ اللّٰهِ اِنْ طَرَدْتُّهُمْ ؕ— اَفَلَا تَذَكَّرُوْنَ ۟

३०. आणि हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! जर मी ईमानधारकांना आपल्यापासून दूर करेन, तर अल्लाहच्या विरोधात कोण माझी मदत करू शकतो, काय तुम्ही थोडादेखील विचार करीत नाहीत? info
التفاسير:

external-link copy
31 : 11

وَلَاۤ اَقُوْلُ لَكُمْ عِنْدِیْ خَزَآىِٕنُ اللّٰهِ وَلَاۤ اَعْلَمُ الْغَیْبَ وَلَاۤ اَقُوْلُ اِنِّیْ مَلَكٌ وَّلَاۤ اَقُوْلُ لِلَّذِیْنَ تَزْدَرِیْۤ اَعْیُنُكُمْ لَنْ یُّؤْتِیَهُمُ اللّٰهُ خَیْرًا ؕ— اَللّٰهُ اَعْلَمُ بِمَا فِیْۤ اَنْفُسِهِمْ ۖۚ— اِنِّیْۤ اِذًا لَّمِنَ الظّٰلِمِیْنَ ۟

३१. आणि मी तुम्हाला हे नाही सांगत की माझ्याजवळ अल्लाहचे खजिने आहेत. (ऐका!) मी अपरोक्षाचेही ज्ञान बाळगत नाही, ना मी हे सांगतो की मी फरिश्ता आहे. ना माझे असे म्हणणे आहे की ज्यांच्यावर तुमची नजर अपमानाने पडत आहे त्यांना अल्लाह एखादी भलाई देणारच नाही. त्यांच्या मनात जे काही आहे अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो. जर मी असे म्हणेन तर निश्चितच माझीही गणना अत्याचारी लोकांत होईल. info
التفاسير:

external-link copy
32 : 11

قَالُوْا یٰنُوْحُ قَدْ جَادَلْتَنَا فَاَكْثَرْتَ جِدَالَنَا فَاْتِنَا بِمَا تَعِدُنَاۤ اِنْ كُنْتَ مِنَ الصّٰدِقِیْنَ ۟

३२. (जनसमूहाचे लोक) म्हणाले, हे नूह! तू आमच्याशी खूप खूप वाद घातला आहेस. आता तर ज्या गोष्टीचे भय तू आम्हाला दाखवित आहेस तीच आमच्याजवळ आणून दाखव जर तू सच्चा आहेस. info
التفاسير:

external-link copy
33 : 11

قَالَ اِنَّمَا یَاْتِیْكُمْ بِهِ اللّٰهُ اِنْ شَآءَ وَمَاۤ اَنْتُمْ بِمُعْجِزِیْنَ ۟

३३. उत्तर दिले, तीदेखील अल्लाहच आणील जर तो इच्छिल, आणि होय! तुम्ही अल्लाहला विवश करू शकत नाही. info
التفاسير:

external-link copy
34 : 11

وَلَا یَنْفَعُكُمْ نُصْحِیْۤ اِنْ اَرَدْتُّ اَنْ اَنْصَحَ لَكُمْ اِنْ كَانَ اللّٰهُ یُرِیْدُ اَنْ یُّغْوِیَكُمْ ؕ— هُوَ رَبُّكُمْ ۫— وَاِلَیْهِ تُرْجَعُوْنَ ۟ؕ

३४. आणि तुम्हाला माझा उपदेश काहीच लाभ पोहचवू शकत नाही, मग मी कितीही तुमचे भले इच्छिले तरीही. जर अल्लाहची मर्जी तुम्हाला भटकत ठेवण्याची असेल. तोच तुम्हा सर्वांचा पालनकर्ता आहे आणि त्याच्याचकडे तुम्ही परतून जाल. info
التفاسير:

external-link copy
35 : 11

اَمْ یَقُوْلُوْنَ افْتَرٰىهُ ؕ— قُلْ اِنِ افْتَرَیْتُهٗ فَعَلَیَّ اِجْرَامِیْ وَاَنَا بَرِیْٓءٌ مِّمَّا تُجْرِمُوْنَ ۟۠

३५. काय हे म्हणतात की हा ग्रंथ पैगंबराने स्वतः मनाने रचलेला आहे? तर तुम्ही उत्तर द्या की जर तो मी मनाने रचलेला असेल तर माझा गुन्हा माझ्यावर आहे आणि मी त्या अपराधांपासून वेगळा आहे, जे तुम्ही करीत आहात. info
التفاسير:

external-link copy
36 : 11

وَاُوْحِیَ اِلٰی نُوْحٍ اَنَّهٗ لَنْ یُّؤْمِنَ مِنْ قَوْمِكَ اِلَّا مَنْ قَدْ اٰمَنَ فَلَا تَبْتَىِٕسْ بِمَا كَانُوْا یَفْعَلُوْنَ ۟ۚ

३६. आणि नूहकडे वहयी (ईशसंदेश) पाठविली गेली की तुमच्या जनसमूहामध्ये ज्यांनीदेखील ईमान राखले आहे, त्यांच्याखेरीज आता कोणीही ईमान राखणार नाही. तेव्हा त्यांच्या कर्मांबद्दल दुःखी होऊ नका. info
التفاسير:

external-link copy
37 : 11

وَاصْنَعِ الْفُلْكَ بِاَعْیُنِنَا وَوَحْیِنَا وَلَا تُخَاطِبْنِیْ فِی الَّذِیْنَ ظَلَمُوْا ۚ— اِنَّهُمْ مُّغْرَقُوْنَ ۟

३७. आणि एक नौका आमच्या डोळ्यांदेखत आणि आमच्या वहयीनुसार तयार करा आणि अत्याचारी लोकांविषयी आम्हाला काहीही बोलू नका, त्यांना पाण्यात बुडविले जाणार आहे. info
التفاسير: