(१) अर्थात हा चांगला मोबदला आणि सुख - संपन्नता त्याच लोकांसाठी आहे जे या जगात अल्लाहचे भय बाळगून राहतात आणि या भयामुळे अल्लाहच्या अवज्ञेपासून दूर राहतात. जर प्रसंगी, मानवी निकडीमुळे अल्लाहची अवज्ञा झाली, तर त्वरित क्षमा याचना (तौबा) करतात आणि पुढे तसा अपराध न करण्याचा दृढसंकल्प करून आपले आचरण सुधारतात. येथपावेतो की त्यांच्या मृत्यु याच आज्ञापालनासह झाला, अवक्षेसह नव्हे. तात्पर्य, जो मनुष्य अल्लाहचे भय राखतो तो अवज्ञा करण्यावर दुराग्रह करीत नाही आणि ना त्यावर अटळ राहतो.