Ibisobanuro bya qoran ntagatifu - Ibisobanuro bya Qur'an Ntagatifu mu rurimi rw'ikimariti - Muhammad Shafii Answaari.

external-link copy
72 : 38

فَاِذَا سَوَّیْتُهٗ وَنَفَخْتُ فِیْهِ مِنْ رُّوْحِیْ فَقَعُوْا لَهٗ سٰجِدِیْنَ ۟

७२. तर जेव्हा मी त्याला यथायोग्य करीन आणि त्याच्यात आपला आत्मा फुंकीन, तेव्हा तुम्ही सर्व त्याच्यासमोर सजदा करा१ (माथा टेका) info

(१) हा सजदा (माथा टेकणे) आभार किंवा आदराप्रित्यर्थ आहे, उपासनेचा सजदा नाही. आदर-सन्मानाचा हा सजदा पूर्वी उचित होता. यास्तव अल्लाहने सर्व फरिश्त्यांना, आदमला सजदा करण्याचा आदेश दिला. आता इस्लाम धर्मात सन्मानपूर्वक सजदा कोणाकरिताही उचित नाही. हदीसमधील उल्लेखानुसार पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी फर्माविले, ‘‘जर हे उचित असते तर मी पत्नीला आदेश दिला असता की तिने आपल्या पतीला सजदा करावा.’’ (मिश्कात, किताबुन्निकाह बाबु इशतिन्निसाए, संदर्भ तिर्मिजी, अलबानीच्या मते आपल्या साक्षींच्या आधारावर हे हदीसवचन खरे (उचित) आहे.)

التفاسير: