Ibisobanuro bya qoran ntagatifu - Ibisobanuro bya Qur'an Ntagatifu mu rurimi rw'ikimariti - Muhammad Shafii Answaari.

Sajdat

external-link copy
1 : 32

الٓمّٓ ۟ۚ

१. अलिफ. लाम. मीम १ info

१ सूरह अलिफ लाम मीम अस्सजदा हदीसमधील उल्लेखानुसार पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शुक्रवारच्या दिवशी प्रातःकालीन (फज्र) नमाजमध्ये अलिफ-लाम-मीम अस्सजदा (आणि दुसऱ्या रकअतमध्ये) सूरह दहरचे पठण करीत असत. (सहीह बुखारी आणि मुस्लिम किताबुल जुमा) त्याचप्रमाणे हेदेखील योग्य प्रमाणाद्वारे सिद्ध आहे की पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम झोपण्यापूर्वी सूरह अलिफ-लाम-मीम अस्सजदा आणि सूरह मुल्कचे पठण करीत असत. (तिर्मिजी नं. ८१२ आणि मुसनद अहमद ३४०/३)

التفاسير:

external-link copy
2 : 32

تَنْزِیْلُ الْكِتٰبِ لَا رَیْبَ فِیْهِ مِنْ رَّبِّ الْعٰلَمِیْنَ ۟ؕ

२. निःसंशय, हा ग्रंथ सर्व विश्वांच्या पालनकर्त्यातर्फे अवतरित झाला आहे. info
التفاسير:

external-link copy
3 : 32

اَمْ یَقُوْلُوْنَ افْتَرٰىهُ ۚ— بَلْ هُوَ الْحَقُّ مِنْ رَّبِّكَ لِتُنْذِرَ قَوْمًا مَّاۤ اَتٰىهُمْ مِّنْ نَّذِیْرٍ مِّنْ قَبْلِكَ لَعَلَّهُمْ یَهْتَدُوْنَ ۟

३. काय हे असे म्हणतात की याने हा ग्रंथ मनाने रचून घेतला आहे?१ मुळीच नाही. किंबहुना हा तुमच्या पालनकर्त्यातर्फे सत्य आहे, यासाठी की तुम्ही त्यांना भय दाखवावे, ज्यांच्याजवळ तुमच्यापूर्वी कोणी भय दाखविणारा आला नाही. संभवतः ते सत्य मार्गावर यावेत. info

(१) हे खडसावून सांगण्याच्या पद्धतीने आहे की काय समस्त विश्वांच्या पालनकर्त्यातर्फे अवतरित केल्या गेलेल्या या महत्त्वपूर्ण ग्रंथाविषयी असे म्हणतात की यास स्वतः (मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांनी रचले आहे.

التفاسير:

external-link copy
4 : 32

اَللّٰهُ الَّذِیْ خَلَقَ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضَ وَمَا بَیْنَهُمَا فِیْ سِتَّةِ اَیَّامٍ ثُمَّ اسْتَوٰی عَلَی الْعَرْشِ ؕ— مَا لَكُمْ مِّنْ دُوْنِهٖ مِنْ وَّلِیٍّ وَّلَا شَفِیْعٍ ؕ— اَفَلَا تَتَذَكَّرُوْنَ ۟

४. अल्लाह तो आहे, ज्याने आकाशांना आणि धरतीला आणि जे काही त्यांच्या दरम्यान आहे, सर्व काही सहा दिवसांत निर्माण केले, मग अर्श (ईशसिंहासना) वर उच्च झाला. तुमच्याकरिता, त्याच्याखेरीज कोणीही मदत करणारा, शिफारस करणारा नाही, मग काय तरीही तुम्ही बोध ग्रहण करीत नाही? info
التفاسير:

external-link copy
5 : 32

یُدَبِّرُ الْاَمْرَ مِنَ السَّمَآءِ اِلَی الْاَرْضِ ثُمَّ یَعْرُجُ اِلَیْهِ فِیْ یَوْمٍ كَانَ مِقْدَارُهٗۤ اَلْفَ سَنَةٍ مِّمَّا تَعُدُّوْنَ ۟

५. तो आकाशापासून धरतीपर्यंत कार्य-व्यवस्था करतो, मग (ते कार्य) एका अशा दिवसात त्याच्या दिशेने वर चढते, ज्याचे अनुमान तुमच्या हिशोबाच्या एक हजार वर्षांइतके आहे. info
التفاسير:

external-link copy
6 : 32

ذٰلِكَ عٰلِمُ الْغَیْبِ وَالشَّهَادَةِ الْعَزِیْزُ الرَّحِیْمُ ۟ۙ

६. तोच विद्यमान आणि अपरोक्षाचा जाणणारा आहे, जबरदस्त वर्चस्वशाली, मोठा मेहेरबान. info
التفاسير:

external-link copy
7 : 32

الَّذِیْۤ اَحْسَنَ كُلَّ شَیْءٍ خَلَقَهٗ وَبَدَاَ خَلْقَ الْاِنْسَانِ مِنْ طِیْنٍ ۟ۚ

७. त्याने जी वस्तु देखील बनविली खूप सुंदर बनविली आणि मानवाची निर्मिती मातीपासून सुरू केली. info
التفاسير:

external-link copy
8 : 32

ثُمَّ جَعَلَ نَسْلَهٗ مِنْ سُلٰلَةٍ مِّنْ مَّآءٍ مَّهِیْنٍ ۟ۚ

८. मग त्याचा वंश एका तुच्छ पाण्याच्या सार तत्त्वाने बनविला. info
التفاسير:

external-link copy
9 : 32

ثُمَّ سَوّٰىهُ وَنَفَخَ فِیْهِ مِنْ رُّوْحِهٖ وَجَعَلَ لَكُمُ السَّمْعَ وَالْاَبْصَارَ وَالْاَفْـِٕدَةَ ؕ— قَلِیْلًا مَّا تَشْكُرُوْنَ ۟

९. ज्याला यथायोग्य करून, त्यात आपला प्राण (रुह) फुंकला, आणि त्यानेच तुमचे कान, डोळे आणि हृदय बनविले (तरीदेखील) तुम्ही फारच कमी कृतज्ञता दाखविता. info
التفاسير:

external-link copy
10 : 32

وَقَالُوْۤا ءَاِذَا ضَلَلْنَا فِی الْاَرْضِ ءَاِنَّا لَفِیْ خَلْقٍ جَدِیْدٍ ؕ۬— بَلْ هُمْ بِلِقَآءِ رَبِّهِمْ كٰفِرُوْنَ ۟

१०. आणि ते म्हणाले की काय आम्ही जेव्हा जमिनीत मिसळून हरवले जाऊ, काय मग पुन्हा नव्या जीवनात येऊ? खरी गोष्ट अशी की या लोकांना आपल्या पालनकर्त्याच्या भेटीचा विश्वासच नाही. info
التفاسير:

external-link copy
11 : 32

قُلْ یَتَوَفّٰىكُمْ مَّلَكُ الْمَوْتِ الَّذِیْ وُكِّلَ بِكُمْ ثُمَّ اِلٰی رَبِّكُمْ تُرْجَعُوْنَ ۟۠

११. त्यांना सांगा, तुम्हाला मृत्युचा फरिश्ता मरण देईल जो तुमच्यावर तैनात केला गेला आहे, मग तुम्ही सर्व आपल्या पालनकर्त्याकडे परतविले जाल. info
التفاسير: