Ibisobanuro bya qoran ntagatifu - Ibisobanuro bya Qur'an Ntagatifu mu rurimi rw'ikimariti - Muhammad Shafii Answaari.

external-link copy
19 : 3

اِنَّ الدِّیْنَ عِنْدَ اللّٰهِ الْاِسْلَامُ ۫— وَمَا اخْتَلَفَ الَّذِیْنَ اُوْتُوا الْكِتٰبَ اِلَّا مِنْ بَعْدِ مَا جَآءَهُمُ الْعِلْمُ بَغْیًا بَیْنَهُمْ ؕ— وَمَنْ یَّكْفُرْ بِاٰیٰتِ اللّٰهِ فَاِنَّ اللّٰهَ سَرِیْعُ الْحِسَابِ ۟

१९. निःसंशय, अल्लाहच्या जवळ दीन (धर्म) केवळ इस्लामच आहे.१ (अल्लाहकरिता परिपूर्ण आत्मसमर्पण) आणि ज्यांना ग्रंथ दिला गेला, त्यांनी ज्ञान येऊन पोहोचल्यानंतर आपसातील द्वेष-मत्सरामुळे मतभेद केला आणि जो अल्लाहच्या आयतींना (पवित्र कुरआनाला) न मानेल तर अल्लाह लवकरच हिशोब घेईल. info

(१) इस्लाम तोच दीन-धर्म आहे, ज्याचा प्रचार-प्रसार आणि शिकवण प्रत्येक पैगंबर आपापल्या काळात देत राहिले आणि आता तो परिपूर्ण स्वरूपात आहे, जो अंतिम प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, यांनी जगासमोर प्रस्तुत केला आहे. ज्यात एकेश्वरवाद (तौहीद), रिसालत (प्रेषित्व) आणि आखिरत (मरणोत्तर जीवन) वर अशा प्रकारे अटळ विश्वास राखायचा आहे जसा पैगंबर (स.) यांनी सांगितला आहे. केवळ एकेश्वरवादावर धारणा राखून काही सत्कर्मे पार पाडल्याने इस्लाम साध्य होत नाही आणि ना अशाने आखिरतमध्ये मुक्ती मिळू शकेल. अकीदा (श्रद्धा) आणि दीन (धर्म) तर हा की अल्लाहला एकमेव मानले जावे, केवळ त्याच एक अल्लाहची भक्ती-उपासना केली जावी, हजरत मुहम्मद (स.) यांच्यासमेत इतर सर्व पैगंबरांवर ईमान राखले जावे आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर प्रेषित्व समाप्त झाल्याचे मानले जावे आणि आशेसह ते ईमान व कर्म पार पाडले जावे जे कुरआन आणि पैगंबरांच्या कथनांद्वारे उल्लेखित आहे. आता या इस्लामखेरीज कोणताही दीन-धर्म अल्लाहजवळ स्वीकृत ठरणार नाही.
‘’आणि जो मनुष्य इस्लामला सोडून अन्य एखाद्या धर्माचा शोध घेईल तर त्याचा तो धर्म कबूल केला जाणार नाही आणि आखिरतमध्ये तो नुकसान भोगणाऱ्यांपैकी असेल.’’ (आले इमरान-५८)
‘’सांगा की लोक हो! मी तुम्हा सर्वांकडे अल्लाहचा रसूल (पैगंबर) आहे.’’ (सूरह आराफ-१५८)
‘’मोठा शुभ आणि समृद्धशाली आहे तो (अल्लाह) ज्याने आपल्या दासावर फुर्कान (सत्य व असत्यामधील भेद जाहीर करणारा ग्रंथ) अवतरित केला, यासाठी की जगाला सचेत करावे.’’ (अल फुर्कान-१)

التفاسير: