Ibisobanuro bya qoran ntagatifu - Ibisobanuro bya Qur'an Ntagatifu mu rurimi rw'ikimariti - Muhammad Shafii Answaari.

external-link copy
23 : 2

وَاِنْ كُنْتُمْ فِیْ رَیْبٍ مِّمَّا نَزَّلْنَا عَلٰی عَبْدِنَا فَاْتُوْا بِسُوْرَةٍ مِّنْ مِّثْلِهٖ ۪— وَادْعُوْا شُهَدَآءَكُمْ مِّنْ دُوْنِ اللّٰهِ اِنْ كُنْتُمْ صٰدِقِیْنَ ۟

२३. आणि जर तुम्हाला त्याबाबत शंका असेल, जे आम्ही आपल्या दासावर अवतरीत केले आहे. तेव्हा तुम्ही सच्चे असाल तर यासारखी एखादी सूरह (अध्याय) बनवून आणा तुम्हाला सूट दिली जाते की अल्लाहच्या शिवाय आपल्या सहभागींनाही (उपास्यांनाही) बोलावून घ्या. १ info

(१) तौहीद (अल्लाहला एक मानणे आणि फक्त त्याचीच उपासना करणे) नंतर आता रिसालत (प्रेषितत्वा) विषयी सांगितले जात आहे. आम्ही आपल्या दासावर जो ग्रंथ अवतरीत केला तो अल्लाहतर्फे उतरविल्या जाण्याबाबत जर तुम्हाला शंका-सवंशय आहे. तेव्हा तुम्ही आपल्या सर्व मदत करणाऱ्यांसह मिळून यासारखी एक तरी सूरह (अध्याय) बनवून दाखवा आणि जर तुम्ही असे करू शकत नसाल तर तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की वास्तविक हा ग्रंथ एखाद्या मानवाने रचलेला ग्रंथ नाही. किंबहुना सर्वश्रेष्ठ अल्लाहचाच ग्रंथ आहे. तेव्हा अल्लाहवर आणि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या प्रेषितत्वावर ईमान राखून जहन्नमच्या भयंकर आगीपासून स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करा. कारण जहन्नमची ती आग काफिरांसाठी अर्थात इन्कार करणाऱ्यांसाठीच निर्माण केली गेली आहे.

التفاسير: