Ibisobanuro bya qoran ntagatifu - Ibisobanuro bya Qur'an Ntagatifu mu rurimi rw'ikimariti - Muhammad Shafii Answaari.

external-link copy
136 : 2

قُوْلُوْۤا اٰمَنَّا بِاللّٰهِ وَمَاۤ اُنْزِلَ اِلَیْنَا وَمَاۤ اُنْزِلَ اِلٰۤی اِبْرٰهٖمَ وَاِسْمٰعِیْلَ وَاِسْحٰقَ وَیَعْقُوْبَ وَالْاَسْبَاطِ وَمَاۤ اُوْتِیَ مُوْسٰی وَعِیْسٰی وَمَاۤ اُوْتِیَ النَّبِیُّوْنَ مِنْ رَّبِّهِمْ ۚ— لَا نُفَرِّقُ بَیْنَ اَحَدٍ مِّنْهُمْ ؗ— وَنَحْنُ لَهٗ مُسْلِمُوْنَ ۟

१३६. (हे ईमानधारकांनो!) तुम्ही सर्व सांगा, आम्ही अल्लाहवर ईमान राखले आणि त्यावरही जे आमच्याकडे उतरविले गेले आणि जे इब्राहीम, इस्माईल, इसहाक, याकूब आणि त्यांच्या संततीवर उतरविले गेले आणि जे काही अल्लाहच्या तर्फे मूसा, ईसा आणि अन्य पैगंबरांना दिले गेले. आम्ही त्यांच्यापैकी कोणाच्याही दरम्यान फरक करीत नाही. आम्ही अल्लाहचे ताबेदार आहोत.१ info

(१) अर्थात ईमानची व्यापक व्याख्या ही की सर्व पैगंबरांना अल्लाहतर्फे जे काही मिळाले किंवा त्यांच्यावर अवतरीत झाले, त्या सर्वांवर ईमान राखले जावे. कोणत्याही ग्रंथाचा किंवा पैगंबराचा इन्कार केला जाऊ नये. एखाद्या ग्रंथाला किंवा पैगंबराला मानणे, आणि दुसऱ्याचा नकार दर्शविणे ही गोष्ट पैगंबरांच्या दरम्यान फरक जाहीर करते, जी इस्लामच्या मते उचित नाही. तथापि आता आचरण मात्र पवित्र कुरआनच्या नियम आणि आदेशांना अनुसरून होईल. पूर्वीच्या अवतरीत ग्रंथातील आदेशानुसार नव्हे. कारण प्रथम तर ते ग्रंथ आपल्या मूळ स्वरूपात नाहीत. फेरबदल झालेले आहेत आणि दुसरे हे की कुरआनने त्या सर्वांच्या आदेशांना रद्द केले आहे.

التفاسير: