Tradução dos significados do Nobre Qur’an. - Tradução marata - Muhammad Shafi Ansari

Número de página:close

external-link copy
114 : 4

لَا خَیْرَ فِیْ كَثِیْرٍ مِّنْ نَّجْوٰىهُمْ اِلَّا مَنْ اَمَرَ بِصَدَقَةٍ اَوْ مَعْرُوْفٍ اَوْ اِصْلَاحٍ بَیْنَ النَّاسِ ؕ— وَمَنْ یَّفْعَلْ ذٰلِكَ ابْتِغَآءَ مَرْضَاتِ اللّٰهِ فَسَوْفَ نُؤْتِیْهِ اَجْرًا عَظِیْمًا ۟

११४. त्यांच्या बहुतेक गुप्त काानगोष्टींमध्ये कसलीही भलाई नाही. परंतु ज्याने उपकार, नेकी किंवा लोकांमध्ये सुधारणा होण्यासाठी आदेश दिला आणि जो हे कार्य अल्लाहची मर्जी (प्रसन्नता) प्राप्त करण्यासाठी करेल, आम्ही खरोखर त्याला फार मोठा मोबदला प्रदान करू. info
التفاسير:

external-link copy
115 : 4

وَمَنْ یُّشَاقِقِ الرَّسُوْلَ مِنْ بَعْدِ مَا تَبَیَّنَ لَهُ الْهُدٰی وَیَتَّبِعْ غَیْرَ سَبِیْلِ الْمُؤْمِنِیْنَ نُوَلِّهٖ مَا تَوَلّٰی وَنُصْلِهٖ جَهَنَّمَ ؕ— وَسَآءَتْ مَصِیْرًا ۟۠

११५. आणि जो कोणी, सरळ व सत्य मार्ग स्पष्ट झाल्यानंतर पैगंबर (मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांचा विरोध करील आणि ईमानधारकांच्या मार्गाशिवाय अन्य मार्गावर चालेल तर आम्ही त्याला त्याच दिशेने, जिकडे तो फिरत असेल, वळवून टाकू, मग त्याला आम्ही जहन्नममध्ये फेकून देऊ आणि ते मोठे वाईट स्थान आहे. info
التفاسير:

external-link copy
116 : 4

اِنَّ اللّٰهَ لَا یَغْفِرُ اَنْ یُّشْرَكَ بِهٖ وَیَغْفِرُ مَا دُوْنَ ذٰلِكَ لِمَنْ یَّشَآءُ ؕ— وَمَنْ یُّشْرِكْ بِاللّٰهِ فَقَدْ ضَلَّ ضَلٰلًا بَعِیْدًا ۟

११६. अल्लाह, आपल्यासह दुसऱ्या कोणाला सहभागी केले जाणे कदापि माफ करणार नाही आणि याखेरीज इतर अपराधांना, तो ज्याला इच्छिल माफ करील आणि ज्याने अल्लाहसह अन्य कोणाला सहभागी ठरविले तो (सन्मार्गापासून) फार दूर बहकत गेला. info
التفاسير:

external-link copy
117 : 4

اِنْ یَّدْعُوْنَ مِنْ دُوْنِهٖۤ اِلَّاۤ اِنٰثًا ۚ— وَاِنْ یَّدْعُوْنَ اِلَّا شَیْطٰنًا مَّرِیْدًا ۟ۙ

११७. हे तर अल्लाहला सोडून केवळ देवींना पुकारतात आणि वस्तुतः हे धिःक्कारलेल्या दुष्ट सैतानाला पुकारतात. info
التفاسير:

external-link copy
118 : 4

لَّعَنَهُ اللّٰهُ ۘ— وَقَالَ لَاَتَّخِذَنَّ مِنْ عِبَادِكَ نَصِیْبًا مَّفْرُوْضًا ۟ۙ

११८. ज्याचा अल्लाहने धिःक्कार केला आहे आणि त्याने (सैतानाने) म्हटले आहे की मी तुझ्या दासांमधून आपला ठराविक हिस्सा निश्चित घेईन. info
التفاسير:

external-link copy
119 : 4

وَّلَاُضِلَّنَّهُمْ وَلَاُمَنِّیَنَّهُمْ وَلَاٰمُرَنَّهُمْ فَلَیُبَتِّكُنَّ اٰذَانَ الْاَنْعَامِ وَلَاٰمُرَنَّهُمْ فَلَیُغَیِّرُنَّ خَلْقَ اللّٰهِ ؕ— وَمَنْ یَّتَّخِذِ الشَّیْطٰنَ وَلِیًّا مِّنْ دُوْنِ اللّٰهِ فَقَدْ خَسِرَ خُسْرَانًا مُّبِیْنًا ۟ؕ

११९. आणि त्यांना सरळ मार्गापासून भटकवित राहीन आणि त्यांना खोट्या आशा देत राहील आणि त्यांना शिकवण देईन की जनावरांचे कान चिरा आणि त्यांना सांगेन की अल्लाहने बनविलेले स्वरूप विकृत करा. ऐका! जो, अल्लाहला सोडून सैतानाला आपला मित्र बनवील तर तो उघड अशा तोट्यात राहील. info
التفاسير:

external-link copy
120 : 4

یَعِدُهُمْ وَیُمَنِّیْهِمْ ؕ— وَمَا یَعِدُهُمُ الشَّیْطٰنُ اِلَّا غُرُوْرًا ۟

१२०. तो त्यांच्याशी तोंडी वायदे करत राहील आणि त्यांना भ्रमाच्या हिरव्या बागा दाखवित राहील (परंतु लक्षात ठेवा) सैतानाने त्यांच्याशी केलेले वायदे पूर्णपणे धोका आहे (मृगजळ) आहे. info
التفاسير:

external-link copy
121 : 4

اُولٰٓىِٕكَ مَاْوٰىهُمْ جَهَنَّمُ ؗ— وَلَا یَجِدُوْنَ عَنْهَا مَحِیْصًا ۟

१२१. हेच ते लोक आहेत, ज्यांचे ठिकाण जहन्नम आहे. जिथून त्यांना कदापि सुटका मिळणार नाही. info
التفاسير: