(१) इथे त्याचीच उपासना निखालसपणे करण्यावर जोर दिला गेला आहे, ज्याचा आदेश या आधीच्या आयतीत आहे की उपासना व आज्ञापालन केवळ एक अल्लाहचाच अधिकार आहे. ना त्याच्या उपासनेत दुसऱ्या कोणाला भागीदार बनविणे वैध आहे, ना आज्ञा पालनाचाही त्याच्याखेरीज दुसरा कोणी हक्कदार आहे. परंतु पैगंबर सल्लल्लाहु अलेहि वसल्लम यांच्या आज्ञा पालनास स्वतः अल्लाहनेच आपले आज्ञापालन म्हटले आहे, तेव्हा पैगंबर (स.) सल्लल्लाहु अलेहि वसल्लम यांचा आज्ञाधारक अल्लाहचाच आज्ञाधारक आहे, दुसऱ्या कोणाचा नाही. तसेच उपासनेत ही गोष्ट नाही. यासाठी की उपासना अल्लाहखेरीज एखाद्या मोठ्यात मोठ्या पैगंबराचीही वैध नाही, तर सर्वसामान्य माणसाची कोठून? ज्यांना लोकांनी मनमानी करून अल्लाहच्या हक्क व अधिकारांचा मालक बनवून ठेवले आहे. ‘माअन्जुलल्लाहु बिहा मिन सुलतान.’ ‘‘अल्लाहतर्फे या संदर्भात कोणतेही प्रमाण नाही.’’