Tradução dos significados do Nobre Qur’an. - Tradução marata - Muhammad Shafi Ansari

Número de página:close

external-link copy
84 : 2

وَاِذْ اَخَذْنَا مِیْثَاقَكُمْ لَا تَسْفِكُوْنَ دِمَآءَكُمْ وَلَا تُخْرِجُوْنَ اَنْفُسَكُمْ مِّنْ دِیَارِكُمْ ثُمَّ اَقْرَرْتُمْ وَاَنْتُمْ تَشْهَدُوْنَ ۟

८४. आणि जेव्हा आम्ही तुमच्याकडून वचन घेतले की आपसात रक्तपात करू नका (हत्या करू नका) आणि आपल्याच लोकांना देशाबाहेर घालवू नका. तुम्ही मान्य केले आणि तुम्ही याचे साक्षीदारही बनले. info
التفاسير:

external-link copy
85 : 2

ثُمَّ اَنْتُمْ هٰۤؤُلَآءِ تَقْتُلُوْنَ اَنْفُسَكُمْ وَتُخْرِجُوْنَ فَرِیْقًا مِّنْكُمْ مِّنْ دِیَارِهِمْ ؗ— تَظٰهَرُوْنَ عَلَیْهِمْ بِالْاِثْمِ وَالْعُدْوَانِ ؕ— وَاِنْ یَّاْتُوْكُمْ اُسٰرٰی تُفٰدُوْهُمْ وَهُوَ مُحَرَّمٌ عَلَیْكُمْ اِخْرَاجُهُمْ ؕ— اَفَتُؤْمِنُوْنَ بِبَعْضِ الْكِتٰبِ وَتَكْفُرُوْنَ بِبَعْضٍ ۚ— فَمَا جَزَآءُ مَنْ یَّفْعَلُ ذٰلِكَ مِنْكُمْ اِلَّا خِزْیٌ فِی الْحَیٰوةِ الدُّنْیَا ۚ— وَیَوْمَ الْقِیٰمَةِ یُرَدُّوْنَ اِلٰۤی اَشَدِّ الْعَذَابِ ؕ— وَمَا اللّٰهُ بِغَافِلٍ عَمَّا تَعْمَلُوْنَ ۟

८५. तरीही तुम्ही स्वजनांची हत्या केली आणि आपल्या एका समूहाला देशाबाहेर घालविले आणि अपराध व द्वेष करण्याच्या कामात त्यांच्याविरूद्ध दुसऱ्याची बाजू धरली. मात्र जेव्हा ते कैदी बनून तुमच्याजवळ आले तेव्हा तुम्ही त्यांच्या मोबदल्यात धन दिले (ज्याला फिदीया म्हणतात) परंतु त्यांना देशाबाहेर घालविणे जे तुमच्यावर हराम होते (त्याची काहीच काळजी घेतली नाही) काय तुम्ही ग्रंथातल्या काही गोष्टींना मान्य करता आणि काही गोष्टींना नाकारता? तुमच्यापैकी जो कोणी असे करील, त्याची शिक्षा याखेरीज काय असावी की या जगात अपमान आणि कयामतीच्या दिवशी भयंकर शिक्षा- यातनांचा मारा! आणि अल्लाह तुमच्या कर्मांपासून गाफील नाही. info
التفاسير:

external-link copy
86 : 2

اُولٰٓىِٕكَ الَّذِیْنَ اشْتَرَوُا الْحَیٰوةَ الدُّنْیَا بِالْاٰخِرَةِ ؗ— فَلَا یُخَفَّفُ عَنْهُمُ الْعَذَابُ وَلَا هُمْ یُنْصَرُوْنَ ۟۠

८६. हे असे लोक आहेत ज्यांनी ऐहिक जीवनाला आखिरतच्या मोबदल्यात खरेदी केले आहे. त्यांची ना शिक्षा कमी होईल आणि ना त्यांची काही मदत केली जाईल. info
التفاسير:

external-link copy
87 : 2

وَلَقَدْ اٰتَیْنَا مُوْسَی الْكِتٰبَ وَقَفَّیْنَا مِنْ بَعْدِهٖ بِالرُّسُلِ ؗ— وَاٰتَیْنَا عِیْسَی ابْنَ مَرْیَمَ الْبَیِّنٰتِ وَاَیَّدْنٰهُ بِرُوْحِ الْقُدُسِ ؕ— اَفَكُلَّمَا جَآءَكُمْ رَسُوْلٌۢ بِمَا لَا تَهْوٰۤی اَنْفُسُكُمُ اسْتَكْبَرْتُمْ ۚ— فَفَرِیْقًا كَذَّبْتُمْ ؗ— وَفَرِیْقًا تَقْتُلُوْنَ ۟

८७. आणि आम्ही मूसाला ग्रंथ प्रदान केला आणि त्यांच्यानंतर सतत रसूल (पैगंबर) ही पाठविले आणि आम्ही मरियम-पुत्र ईसाला स्पष्ट निशाण्या प्रदान केल्या आणि पवित्र आत्मा (हजरत जिब्रील) द्वारे त्यांना समर्थन दिले गेले. परंतु जेव्हा जेव्हा तुमच्याजवळ रसूल (पैगंबर) ती गोष्ट घेऊन आले, जी तुमच्या विचारांच्या विरूद्ध होती, तुम्ही तत्काळ घमेंड दाखविली, मग काहींना तुम्ही खोटे ठरविले आणि काहींना जीवे ठार मारले. info
التفاسير:

external-link copy
88 : 2

وَقَالُوْا قُلُوْبُنَا غُلْفٌ ؕ— بَلْ لَّعَنَهُمُ اللّٰهُ بِكُفْرِهِمْ فَقَلِیْلًا مَّا یُؤْمِنُوْنَ ۟

८८. आणि ते म्हणाले, आमची मने झाकलेली आहेत (नाही, नाही) किंबहुना त्यांच्या कुप्र (इन्कारा) मुळे, अल्लाहने त्यांना धिक्कारले आहे. तेव्हा त्यांच्यात ईमान राखणारे फार थोडेच आहेत! info
التفاسير: