(१) ‘जन्नतुल फिरदौस’ जन्नतचा सर्वोच्च दर्जा आहे. यास्तव पैगंबर (स.) यांनी फर्माविले की जेव्हा देखील तुम्ही अल्लाहजवळ जन्नतची याचना कराल, तेव्हा अल फिर्दोसची याचना करा, कारण ते जन्नतचे सर्वोच्च स्थान आहे आणि तिथूनच जन्नतच्या नद्यांचा उगम आहे. (सहीह बुखारी, किताबुत्तौहिद, बाबुल व कान अर्शुहु अलल माए)
(१) सत्कर्म ते होय, जे पैगंबरांच्या आचरणशैलीनुसार असावे, अर्थात जो कोणी आपल्या पालनकर्त्या(अल्लाह) च्या भेटीचा पुरेपूर विश्वास बाळगत असेल त्याने प्रत्येक कर्म पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या आचरणशैलीनुसार करावे, आणि दुसरे असे की अल्लाहच्या उपासनेत दुसऱ्या कोणालाही सहभागी ठरवू नये, यासाठी की धर्मात नवीन गोष्टी सामील करणे आणि मूर्तीपूजा करणे या दोन्ही गोष्टी कर्म वाया जाण्यास कारक ठरतात. सर्वश्रेष्ठ अल्लाह, या दोन्ही गोष्टींपासून प्रत्येक मुसलमानाचे रक्षण करो.