د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري

د مخ نمبر:close

external-link copy
12 : 41

فَقَضٰىهُنَّ سَبْعَ سَمٰوَاتٍ فِیْ یَوْمَیْنِ وَاَوْحٰی فِیْ كُلِّ سَمَآءٍ اَمْرَهَا وَزَیَّنَّا السَّمَآءَ الدُّنْیَا بِمَصَابِیْحَ ۖۗ— وَحِفْظًا ؕ— ذٰلِكَ تَقْدِیْرُ الْعَزِیْزِ الْعَلِیْمِ ۟

१२. तेव्हा दोन दिवसांत सात आकाश बनविलेत. प्रत्येक आकाशात त्याच्या योग्य आदेशांची वहयी पाठविली आणि आम्ही या जगाच्या आकाशाला ताऱ्यांनी सुशोभित केले व त्याचे रक्षण केले. ही योजना प्रभुत्वशाली व सर्वज्ञ अशा अल्लाहची आहे. info
التفاسير:

external-link copy
13 : 41

فَاِنْ اَعْرَضُوْا فَقُلْ اَنْذَرْتُكُمْ صٰعِقَةً مِّثْلَ صٰعِقَةِ عَادٍ وَّثَمُوْدَ ۟ؕ

१३. आणि तरीही जर हे तोंड फिरवित असतील तर सांगा की मी तुम्हाला त्या वीजेच्या कडाडण्या (आकाशिय अज़ाब) चे भय दाखवितो, जो आद जनसमूह आणि समूद जनसमूहावर कोसळलेल्या, वीजेच्या कडाडण्यासमान असेल. info
التفاسير:

external-link copy
14 : 41

اِذْ جَآءَتْهُمُ الرُّسُلُ مِنْ بَیْنِ اَیْدِیْهِمْ وَمِنْ خَلْفِهِمْ اَلَّا تَعْبُدُوْۤا اِلَّا اللّٰهَ ؕ— قَالُوْا لَوْ شَآءَ رَبُّنَا لَاَنْزَلَ مَلٰٓىِٕكَةً فَاِنَّا بِمَاۤ اُرْسِلْتُمْ بِهٖ كٰفِرُوْنَ ۟

१४. त्याच्याजवळ जेव्हा त्यांच्या पुढून-मागून पैगंबर आले की तुम्ही अल्लाहखेरीज कोणाचीही उपासना करू नका, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की जर आमच्या पालनकर्त्याने इच्छिले असते, त्याने फरिश्त्यांना पाठविले असते. आम्ही तर तुमच्या प्रेषित्वाचा पूर्णतः इन्कार करतो. info
التفاسير:

external-link copy
15 : 41

فَاَمَّا عَادٌ فَاسْتَكْبَرُوْا فِی الْاَرْضِ بِغَیْرِ الْحَقِّ وَقَالُوْا مَنْ اَشَدُّ مِنَّا قُوَّةً ؕ— اَوَلَمْ یَرَوْا اَنَّ اللّٰهَ الَّذِیْ خَلَقَهُمْ هُوَ اَشَدُّ مِنْهُمْ قُوَّةً ؕ— وَكَانُوْا بِاٰیٰتِنَا یَجْحَدُوْنَ ۟

१५. तर जेव्हा आदने अकारण धरतीवर घमेंड करायला सुरुवात केली आणि म्हणू लागले की आमच्याहून शक्तिशाली कोण आहे, काय त्यांना हे दिसून येत नाही की ज्याने त्यांना निर्माण केले आहे, तो त्यांच्यापेक्षा अधिक शक्तिशाली आहे. ते (शेवटपर्यर्ंत) आमच्या आयतींचा इन्कारच करीत राहिले. info
التفاسير:

external-link copy
16 : 41

فَاَرْسَلْنَا عَلَیْهِمْ رِیْحًا صَرْصَرًا فِیْۤ اَیَّامٍ نَّحِسَاتٍ لِّنُذِیْقَهُمْ عَذَابَ الْخِزْیِ فِی الْحَیٰوةِ الدُّنْیَا ؕ— وَلَعَذَابُ الْاٰخِرَةِ اَخْزٰی وَهُمْ لَا یُنْصَرُوْنَ ۟

१६. तेव्हा शेवटी आम्ही त्यांच्यावर एक सोसाट्याचे वादळ अशुभ दिवसात पाठविले, यासाठी की त्यांना ऐहिक जीवनात अपमानदायक शिक्षा - यातनेची गोडी चाखवावी, (विश्वास करा) की आखिरतचा अज़ाब, यापेक्षा जास्त अपमानित करणारा आहे आणि त्यांना मदतही केली जाणार नाही. info
التفاسير:

external-link copy
17 : 41

وَاَمَّا ثَمُوْدُ فَهَدَیْنٰهُمْ فَاسْتَحَبُّوا الْعَمٰی عَلَی الْهُدٰی فَاَخَذَتْهُمْ صٰعِقَةُ الْعَذَابِ الْهُوْنِ بِمَا كَانُوْا یَكْسِبُوْنَ ۟ۚ

१७. आणि राहिलेत समूद, तर आम्ही त्यांनाही मार्गदर्शन केले, परंतु त्यांनी मार्गदर्शनाच्या तुलनेत आंधळेपणास जास्त महत्व दिले. ज्यामुळे त्यांना (पूर्णपणे) अपमानदायक शिक्षेच्या कडाडण्याने त्यांच्या करतूतींपायी धरले. info
التفاسير:

external-link copy
18 : 41

وَنَجَّیْنَا الَّذِیْنَ اٰمَنُوْا وَكَانُوْا یَتَّقُوْنَ ۟۠

१८. आणि ईमान राखणाऱ्यांना व अल्लाहचे भय बाळगणाऱ्यांना आम्ही (पूर्णतः) वाचविले. info
التفاسير:

external-link copy
19 : 41

وَیَوْمَ یُحْشَرُ اَعْدَآءُ اللّٰهِ اِلَی النَّارِ فَهُمْ یُوْزَعُوْنَ ۟

१९. आणि ज्या दिवशी अल्लाहचे वैरी जहन्नमकडे आणले जातील, आणि त्या (सर्वां) ना एकत्रित केले जाईल. info
التفاسير:

external-link copy
20 : 41

حَتّٰۤی اِذَا مَا جَآءُوْهَا شَهِدَ عَلَیْهِمْ سَمْعُهُمْ وَاَبْصَارُهُمْ وَجُلُوْدُهُمْ بِمَا كَانُوْا یَعْمَلُوْنَ ۟

२०. येथेपर्यंत की जेव्हा जहन्नमच्या अगदी जवळ येऊन पोहचतील तेव्हा त्यांच्यावर त्यांचे कान आणि त्यांचे डोळे व त्यांच्या त्वचा त्यांच्या कर्मांची साक्ष देतील. info
التفاسير: