(१) यात पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना माफी मागण्याचा आदेश दिला गेला आहे. स्वतःसाठीही, आणि ईमान राखणाऱ्यांसाठीही. ‘इस्तगफार’ (क्षमा याचनेचे मोठे महत्त्व आणि प्राधान्य आहे. हदीस वाचनात यावर मोठा जोर दिला गेला आहे. एका हदीसमध्ये पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी फर्माविले, ‘या युहन्नासु तुबुईल रब्बूहुम फइन्नी अस्तग़ फिरुल्लाहा व वुतुबू इलैही फिल यौमिल अक्सरु मिन समईना मर्रतु.’ ‘‘लोकांनो! अल्लाहजवळ तौबा आणि इस्तगफार (क्षमा याचना) करीत राहा, मी देखील अल्लाहजवळ दिवसातून सत्तरपेक्षा जास्त रेळा तौबा इ्स्तगफार करतो.’’ (सहीह बुखारी, बाबु इस्तगफारीन नबीये फिल यौमि वल लैलति)