ការបកប្រែអត្ថន័យគួរអាន - ការបកប្រែជាភាសាម៉ារ៉ាធិ - ម៉ូហាំម៉ាត់ ស្ហាហ្វៀក អាន់សរី

លេខ​ទំព័រ:close

external-link copy
12 : 47

اِنَّ اللّٰهَ یُدْخِلُ الَّذِیْنَ اٰمَنُوْا وَعَمِلُوا الصّٰلِحٰتِ جَنّٰتٍ تَجْرِیْ مِنْ تَحْتِهَا الْاَنْهٰرُ ؕ— وَالَّذِیْنَ كَفَرُوْا یَتَمَتَّعُوْنَ وَیَاْكُلُوْنَ كَمَا تَاْكُلُ الْاَنْعَامُ وَالنَّارُ مَثْوًی لَّهُمْ ۟

१२. ज्या लोकांनी ईमान राखले आणि सत्कर्मे केलीत, त्यांना अल्लाह निश्चितपणे अशा बागांमध्ये दाखल करील, ज्यांच्याखाली प्रवाह वाहत आहेत आणि जे लोक काफिर (इन्कारी) झालेत, ते (केवळ या जगाचाच) लाभ घेत आहेत आणि जनावरांसारखे खात आहेत. त्यांचे (खरे) ठिकाण जहन्नम आहे. info
التفاسير:

external-link copy
13 : 47

وَكَاَیِّنْ مِّنْ قَرْیَةٍ هِیَ اَشَدُّ قُوَّةً مِّنْ قَرْیَتِكَ الَّتِیْۤ اَخْرَجَتْكَ ۚ— اَهْلَكْنٰهُمْ فَلَا نَاصِرَ لَهُمْ ۟

१३. आणि आम्ही कित्येक वस्त्यांना, ज्या शक्ती-सामर्थ्यात तुमच्या या वस्तीपेक्षा अधिक होत्या, जिच्यातून तुम्हाला बाहेर काढले गेले. आम्ही त्यांना नष्ट करून टाकले, ज्यांची मदत करणारा कोणीही नव्हता. info
التفاسير:

external-link copy
14 : 47

اَفَمَنْ كَانَ عَلٰی بَیِّنَةٍ مِّنْ رَّبِّهٖ كَمَنْ زُیِّنَ لَهٗ سُوْٓءُ عَمَلِهٖ وَاتَّبَعُوْۤا اَهْوَآءَهُمْ ۟

१४. काय ते लोक, जे आपल्या पालनकर्त्यातर्फे स्पष्ट प्रमाणावर असावेत त्या माणसासारखे असू शकतात, ज्याच्यासाठी त्याची दुष्कर्मे चांगली (सुशोभित) बनविली गेली असावी. आणि तो आपल्या इच्छा आकांक्षांचे अनुसरण करत असावा? info
التفاسير:

external-link copy
15 : 47

مَثَلُ الْجَنَّةِ الَّتِیْ وُعِدَ الْمُتَّقُوْنَ ؕ— فِیْهَاۤ اَنْهٰرٌ مِّنْ مَّآءٍ غَیْرِ اٰسِنٍ ۚ— وَاَنْهٰرٌ مِّنْ لَّبَنٍ لَّمْ یَتَغَیَّرْ طَعْمُهٗ ۚ— وَاَنْهٰرٌ مِّنْ خَمْرٍ لَّذَّةٍ لِّلشّٰرِبِیْنَ ۚ۬— وَاَنْهٰرٌ مِّنْ عَسَلٍ مُّصَفًّی ؕ— وَلَهُمْ فِیْهَا مِنْ كُلِّ الثَّمَرٰتِ وَمَغْفِرَةٌ مِّنْ رَّبِّهِمْ ؕ— كَمَنْ هُوَ خَالِدٌ فِی النَّارِ وَسُقُوْا مَآءً حَمِیْمًا فَقَطَّعَ اَمْعَآءَهُمْ ۟

१५. त्या जन्नतचे वैशिष्ट्य, जिचा वायदा अल्लाहचे भय राखणाऱ्या लोकांशी केला गेला आहे, असे आहे की तिच्यात (शीतल) जलप्रवाह वाहत आहेत, ज्यांना दुर्गंध नाही आणि दुधाच्या नद्या आहेत, ज्यांचा स्वाद बदलणार नाही. आणि मद्याचे प्रवाह आहेत. ज्यांच्यात पिणाऱ्यांकरिता खूप स्वाद आहे आणि स्रच्छ निर्भेळ मधाचे प्रवाह आहेत, आणि त्यांच्यासाठी तिथे प्रत्येक प्रकारचे मेवे (फळ) आहेत, आणि त्यांच्या पालनकर्त्यातर्फे क्षमा आहे, काय हे त्या लोकांसमान आहेत, जे नेहमी आगीत राहणारे आहेत आणि ज्यांना खूप गरम उकळते पाणी पाजले जाईल, जे त्यांच्या आतडींचे तुकडे तुकडे करील. info
التفاسير:

external-link copy
16 : 47

وَمِنْهُمْ مَّنْ یَّسْتَمِعُ اِلَیْكَ ۚ— حَتّٰۤی اِذَا خَرَجُوْا مِنْ عِنْدِكَ قَالُوْا لِلَّذِیْنَ اُوْتُوا الْعِلْمَ مَاذَا قَالَ اٰنِفًا ۫— اُولٰٓىِٕكَ الَّذِیْنَ طَبَعَ اللّٰهُ عَلٰی قُلُوْبِهِمْ وَاتَّبَعُوْۤا اَهْوَآءَهُمْ ۟

१६. आणि त्यांच्यापैकी काही (असेही आहेत की) जे तुमच्याकडे कान लावतात येथेपर्यंत की जेव्हा तुमच्या जवळून जातात, तेव्हा ज्ञान बाळगणाऱ्यांना (सुस्ती आणि बावळटपणे) विचारतात की त्याने (पैगंबराने) आता एवढ्यात काय सांगितले होते? हेच लोक होत, ज्यांच्या हृदयांवर अल्लाहने मोहर लावली आहे आणि ते आपल्या इच्छा आकांक्षांचे अनुसरण करतात. info
التفاسير:

external-link copy
17 : 47

وَالَّذِیْنَ اهْتَدَوْا زَادَهُمْ هُدًی وَّاٰتٰىهُمْ تَقْوٰىهُمْ ۟

१७. आणि ज्या लोकांनी सन्मार्ग प्राप्त करून घेतला आहे, अल्लाहने त्यांच्या मार्गदर्शनात आणखी वाढ केली आहे, आणि त्यांना त्यांचा सदाचार प्रदान केला आहे. info
التفاسير:

external-link copy
18 : 47

فَهَلْ یَنْظُرُوْنَ اِلَّا السَّاعَةَ اَنْ تَاْتِیَهُمْ بَغْتَةً ۚ— فَقَدْ جَآءَ اَشْرَاطُهَا ۚ— فَاَنّٰی لَهُمْ اِذَا جَآءَتْهُمْ ذِكْرٰىهُمْ ۟

१८. तर काय हे लोक कयामतची प्रतीक्षा करीत आहेत की ती त्यांच्याजवळ अचानक येऊन पोहचावी. निःसंशय, तिची लक्षणे तर जाहीर झाली आहेत, मग जेव्हा कयामत त्यांच्याजवळ येऊन पोहोचेल, तेव्हा त्यांच्यासाठी बोध प्राप्त करण्याची संधी कोठे बाकी राहील? info
التفاسير:

external-link copy
19 : 47

فَاعْلَمْ اَنَّهٗ لَاۤ اِلٰهَ اِلَّا اللّٰهُ وَاسْتَغْفِرْ لِذَنْۢبِكَ وَلِلْمُؤْمِنِیْنَ وَالْمُؤْمِنٰتِ ؕ— وَاللّٰهُ یَعْلَمُ مُتَقَلَّبَكُمْ وَمَثْوٰىكُمْ ۟۠

१९. तेव्हा (हे पैगंबर!) तुम्ही खात्री बाळगा की अल्लाहखेरीज दुसरा कोणी (सच्चा) उपास्य नाही, आणि आपल्या अपराधांची माफी मागत राहा आणि ईमान राखणाऱ्या पुरुषांकरिता व ईमान राखणाऱ्या स्त्रियांकरिताही१ अल्लाह तुमच्या येण्या-जाण्याच्या व निवासाच्या ठिकाणास चांगल्या प्रकारे जाणतो. info

(१) यात पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना माफी मागण्याचा आदेश दिला गेला आहे. स्वतःसाठीही, आणि ईमान राखणाऱ्यांसाठीही. ‘इस्तगफार’ (क्षमा याचनेचे मोठे महत्त्व आणि प्राधान्य आहे. हदीस वाचनात यावर मोठा जोर दिला गेला आहे. एका हदीसमध्ये पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी फर्माविले, ‘या युहन्नासु तुबुईल रब्बूहुम फइन्नी अस्तग़ फिरुल्लाहा व वुतुबू इलैही फिल यौमिल अक्सरु मिन समईना मर्रतु.’ ‘‘लोकांनो! अल्लाहजवळ तौबा आणि इस्तगफार (क्षमा याचना) करीत राहा, मी देखील अल्लाहजवळ दिवसातून सत्तरपेक्षा जास्त रेळा तौबा इ्‌स्तगफार करतो.’’ (सहीह बुखारी, बाबु इस्तगफारीन नबीये फिल यौमि वल लैलति)

التفاسير: